उज्जैन ः पत्रकारांच्या हत्त्या आणि पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यानं त्रस्त झालेल्या मध्ये प्रदेशातील पत्रकारांनाही आता कळून चुकले आहे की,पत्रकार संरक्षण कायद्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत.त्यामुळं राज्यातील विविध पत्रकार संघटनांनी एकत्र येत मुख्यमंत्री कमलनाथ यांना तातडीने पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी केली आहे.
सागर जिल्हयातील पत्रकार चक्रेश जैन यांची नुकतीच निर्मम हत्त्या करण्यात आली.त्यांच्या अंगावर रॉेकेल ओतून त्यांना जाळून मारण्यात आले.या घटनेचे संतप्त पडसाद राज्यभर उमटले.मात्र सागर जिल्हयातील पोलीस प्रशासनाने एका पत्रकाराची हत्त्या झाल्यानंतरही तो विषय ंगभीरपणे घेतलेला नाही.पोलिसांवर दबाव असल्याने आरोपींवर कारवाई होत नसल्याची चर्चा आहे.राज्य शासन देखील जैन यांच्या मारेकर्‍यांचा शोध घेण्याबाबत उदासिन असल्याने संपूर्ण माध्यम जगत संतप्त आहे.ही एकच घटना नाही तर राज्यात सातत्यानं पत्रकारांवर हल्ले होत आहेत.हल्लेखोरांवर कोणतीच कारवाई होत नसल्याने राज्यात संतापाची लाट आहे.याविरोधात मुख्यमंत्र्यांना जे निवेदन दिले गेल आहे त्यात म्हटले आहे की,बहुप्रतिक्षित पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक विधानसभेत आणून ते संमत करावे,चक्रेश जैन यांच्या हत्तयेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी,चक्रेश जैन यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी अशा मागण्या या निवेदनात करण्याात आल्या आहेत.
महाराष्ट्र सरकारनं पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक तर मंजूर केलं पण त्याचे अद्याप कायद्यात रूपांतर झालेले नाही.आता मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,केरळ,दिल्ली आदि राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी जोर धरू लागली आहे.यासाठी आता देशपातळीवर आंदोलन करण्याची गरज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here