पत्रकार संरक्षण कायदयाच्या दृष्टीने कारवाई सुरू

0
903
 माहिती महासंचालक ब्रिजेश सिंग यांची माहिती
महाराष्ट्रातील पत्रकारांवर होणाऱे हल्ले रोखण्यालाठी पत्रकार संरक्षण कायदा करण्याची कारवाई शासनातर्फे सुरू असल्याची माहिती,माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचालक श्री.ब्रिजेश सिंग यांनी काल मुंबईत दिली.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने सातत्यानं या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे.हे सर्वज्ञात आहे.प्रेस क्लबच्यावतीने डिजीटल युगातील पत्रकारिता या विषयावर चर्चा सत्र आयोजित कऱण्यात आले होते./या कार्यक्रमात ब्रिजेश सिंग बोलत होते.डिजिटल युगात लिखाणाचे स्वरूप बदलेले असून सोशल मिडियावर केलेल्या ट्टिटमध्ये देखील बातमी असते.डिजिटल युगात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक असले तरी  लेखण हे देशाची सौर्वभौमता आणि एकता अबाधित राहील असे असावे अशी सूचना त्यानी केली.या कार्यक्रमास प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष न्या.सी.के.प्रसाद प्रमुख पाहूुणे म्हणून उपस्थित होते.
 
पत्रकारितेचे व्रत अंगिकारताना पत्रकारांची सुरक्षा आणि स्वातंत्र्य जपणे हा प्राधान्याचा विषय आहे. मात्र स्वातंत्र्याची अपेक्षा करताना पत्रकारांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्या. सी. के. प्रसाद यांनी केले.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य एस. एन. सिन्हा, के. अमरनाथ, प्रेस क्लबचे अध्यक्ष कुमार केतकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
न्या. प्रसाद यावेळी म्हणाले की, पत्रकारिता करत असताना पत्रकारांवर होणारे हल्ले चिंताजनक असून पत्रकारांच्या सुरक्षेला व स्वातंत्र्याला कौन्सिलने नेहमीच प्राधान्य दिले आहे. पत्रकारांच्या सुरक्षेबरोबरच त्यांची आर्थिक सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. श्रमिक पत्रकारांसाठी राष्ट्रीयस्तरावर कल्याण निधी स्थापन करण्याची आवश्यकता असून निवृत्तीनंतर पत्रकारांना या कल्याण निधीतून ठराविक रक्कम देता येईल, यासाठी पंतप्रधान आणि केंद्रिय माहिती प्रसारण मंत्र्यांशी चर्चा केली आहे, असेही न्या. प्रसाद यांनी यावेळी सांगितले.
पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासंदर्भात राष्ट्रीय कायदा करणे आवश्यक असून यासंदर्भात केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सदस्य श्री. सिन्हा यावेळी सांगितले. सदस्य के. अमरनाथ यांनी लोकशाही देशातील पत्रकारीतेचे स्वातंत्र्य यावर विस्तृत भाष्य केले.
मुंबई प्रेस क्लबचे सचिव धर्मेंद्र जोरे यांनी प्रास्तविक केले. मुंबई प्रेस क्लबचे गुरुबिर सिंग यांनी सुत्रसंचालन केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here