मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेखाली रायगडला 16 कोटींचा निधी 

0
759
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रायगड जिल्हयातील 9 रस्त्यांच्या कामासाठी 16 कोटी रूपयाच्या निधीला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.या योजनेअंतर्गत जिल्हयात 32 किलो मिटर रस्त्यांचे काम केले जाणार आहे.ही सारी कामं जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,महाराष्ट्र ग्रामीण संस्था आदिंच्या माध्यमातून केली जाणार असून त्यासाठी काही निकष नक्की करण्यात आले आहेत.अलिबाग,कर्जत,महाड,पेण,पनवेल,म्हसळा आदि तालुक्यातील कामांचा या योजनेत समावेश केला गेला आहे.बांधकामा व्यतिरिक्त पाच वर्षासाठी नियमित देखभाल,व दुरूस्तीसाठी 1 कोटी 10 लाख रूपयांचा निधीलाही मंजुरी गेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here