पत्रकार रमेश राऊत यांचे निधन

0
827

औरंगाबाद- मराठवाड्यातील एक ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे काल रात्री स्वाईन फ्ल्यूने निधन झाले.मराठवाड्यातील विविध दैनिकात रमेश राऊत यांनी काम केले.तसेच ते सामनामध्येही फिचर एडिटर होते.चित्रलेखा आणि अन्य काही साप्ताहिकासाठी त्यांनी लेखन केले होते.मराठवाड्यातील प्रश्नांची उत्तम माहिती,चांगला लोकसंग्रह,सुंदर हस्ताक्षर आणि स्वतःची वेगळी लेखनशैली असलेल्या रमेश राऊत यांनी मराठवाड्‌ातील पत्रकारितेमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.स्वभाव थोडासा तिरकस असला तरी रमेशने अनेक जिवाभावाचे मित्र जोडले होते.साहित्यिक वर्तुळातही त्यांची उठबस असायची.त्यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारात नक्कीच पोकळी निर्माण झाली आहे.
रमेश राऊत यांच्यावर आज सकाळी अत्यंसंस्कार कऱण्यात आले.यावेळी पत्रकारितेतील त्यांचे अनेक सहकारी उपस्थित होते.
पत्रकारांचे विविध कारणांनी प्रकृत्तीकडे दुर्लक्ष होते हा नेहमीच येणारा अनुभव झाला आहे.काही दिवसांपुर्वी रायगडमधील एक धडाडीचे पत्रकार प्रकाश काटदरे यांचे असेच आकस्मिक निधन झाले.त्यानंतर रमेशच्या रूपाने हा दुसरा धक्का बसला आहे.रमेश राऊत यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी आणि माझे कुटुंबिय सहभागी आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here