पत्रकार यशवंत पाध्ये यांचं निधन

0
881

महाराष्ट्र संपादक परिषदेचे अध्यक्ष,ज्येष्ठ पत्रकार आणि आमचे मित्र यशवंत पाध्ये याचं आज सकाळी साडेपाचच्या सुमारास पुण्यात निधन झाले.ते 79 वर्षांचे होते.नुकतीच त्यांच्यावर एन्जोप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली होती.मात्र नंतर त्याची प्रकृती ठीक नव्हती.अखेर आज सकाळी त्यांचे निधन झाले.आज पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार कऱण्यात आले.
मुळचे कोकणातले असलेले पाध्ये गेली अनेक वर्षे पत्रकारितेत होते.सागर,रत्नागिरी टाइम्समधून त्यांनी पत्रकारिता केली.पत्रकार संघटनेत ते सक्रीय होते. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे ते अध्यक्ष होते. नंतर त्यांनी संपादक परिषदेची स्थापना करून ते अगोदर कार्याध्यक्ष आणि नंतर या संघटनेचे अध्यक्ष झाले.अधिस्वीकृती समिती,शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीवर त्यांनी काम केले होते.महाराष्ट सरकारने त्यांचा दलित मित्र पुरस्कार देऊनही गौरव केला होता.विविध सामाजिक संघटनांशीही पाध्ये यांचा निकटचा संबंध होता.चागले वक्ते असलेल्या पाध्ये यांचे विविध विषयाला वाहिलेली अनेक पुस्तकं प्रसिध्द झाली आहेत. पत्रकारितेतील विविध पुरस्कारही त्यांना मिळाले होते.त्यांच्या निधनाने एक व्यासंगी पत्रकार आपण गमावला असल्याची प्रतिक्रिया पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केली आहे.मराठी पत्रकार परिषदेनेही पाध्ये यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here