” पत्रकार मित्र” हरपला

0
851

गोपीनाथ मुंडे यांचे केवळ बीडमधीलच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांशी चांगले संबंध होते.पत्रकारांच्या प्रश्नांबद्दल त्यांची नेहमीच सकारात्मक भूमिका असायची.महाराष्ट्रातील पत्रकारांवर होत असलेले हल्ले तसेच पत्रकार पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आम्ही अनेकदा त्यांना भेटलो.या दोन्ही मागण्य़ांना त्यांचा पाठिंबा होता.रोहा येथे झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात त्यांनी पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे आणि पत्रकारांना पेन्शन मिळालीच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन केले होते.त्यानंतरही पत्रकारांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते कायदा झालाच पाहिजे असे प्रतिपादन करीत.त्यामुळे कायद्याच्या संदर्भात आम्हाला नेहमीच त्यांचा आधार वाटायचा.

अनेक नेत्यांना पत्रकारांनी केलेली टिका आवडत नाही.टिका कऱणा़ऱ्या पत्रकारांना असे नेते फोन करून धमक्या देतात.दमदाटीही करतात.गोपीनाथ मुंडेवर अनेक पत्रकारांनी अनेकदा टिका केली मात्र त्यांनी कोणाला धमक्या दिल्यात असा अनुभव कोणाला आलेला नाही.ते खऱ्या अर्थाने पत्रकारांचे मित्र होते.हा मित्र गेल्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांना नक्कीच मोठे दुःख झाले आहे.़पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने गोपीनाथजींना विनम्र श्रध्दांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here