“पत्रकार पालकर यांच्यावर हल्ला

0
769

“पत्रकार पालकर यांच्यावर हल्ला करूण जिवे मारण्याचा
प्रयत्न करणा-यावर कडक कारवाई करा.

‘कळंब तालुक्यातील पत्रकारांची मागणी”

कळंब÷(प्रतिनिधी)- मटक्याची बातमी छापल्यामुळे तालुक्यातील सौंदना(अंबा)येथील पत्रकार परमेश्वर पालकर यांना मटका एजंट कडून मारहान करूण जिवे मार-याचा प्रयत्न करणा-या हल्लाखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कळंब तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सौंदना(अंबा) येथील अवैंध मटक्याची बातमी छापल्यामुळे गेली आठ दिवसापासुन पत्रकार पालकर यांना इतरांच्या द्वारे जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या,पत्रकार पालकर हे खाजगी नौकरी निमित्त कळंब येथे वास्तव्यास आहेत,त्यांचे आई वडील मुळ गावी(सौंदना अंबा)येथे राहतात,दि.२४ रोजी रविवारी सुट्टी असल्याने पालकर हे आपल्या गावी गेले असता,त्यांच्यावर मटका एजंट दौलत पालकर व शहाजी पालकर यांनी पत्रकार पालकर यांच्यावर रात्री १०.०० च्या जवळपास अचानक हल्ला करत मारहान करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला,परंतु गावातील काही नागरीकांनी मध्यस्ती करूण हे सोडवले,या संदर्भात रात्री शिराढोण पोलीस ठाण्यात पत्रकार पालकर यांनी तक्रार दाखल केली आहे.
कळंब तालुक्यात अवैंध धंद्यासह मटक्याचे प्रमाण वाढले असून या संदर्भात पत्रकारांनी आवाज उठविल्यास त्यांच्यावर जिवे घेणे हल्ले केले जातात.पालकर यांच्यावर झालेल्या या जिवे घेणे हल्ल्याचा कळंब पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करूण हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी व तालुक्यातील अवैंद मटका बंद करावा अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदार कळंब यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनावर कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश टोणगे,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास मुळीक,पत्रकार ज्ञानेश्वर पतंगे,दिलीप गंभीरे,शितलकुमार घोंगडे,बालाजी आडसुळ,परवेज मुल्ला, माधवसिंह राजपूत,बालाजी सुरवसे,लतीफ सय्यद,विशाल कुंभार,समीर मुल्ला,नरसिंग खिचडे,शरद आडसुळ,दीपक माळी,राजे सावंत,सामाजिक कार्यकर्ते कचरू टकले,पांडुरंग हजारे यांच्या सह्या आहेत.
—————————————————
“पोलीसांची थातुर मातुर कारवाई”
————————————————–
पत्रकार पालकर यांच्यावर जिवेघेणा हल्ला होवुन ही पोलीस प्रशासन मात्र आरोपींना पाठीशी घालत आहेत.यातील आरोपीवर केवळ १०७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here