पत्रकार निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी

    0
    692

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या रडारवर असल्याची माहिती

    कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे हे हिंदूत्त्ववादी संघटनांच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनूसार, पानसरे यांच्या हत्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेला संशयित समीर गायकवाड याच्या फोनवरील संभाषणातून ही माहिती उघड झाली आहे. यापूर्वीही निखिल वागळे यांना ‘सनातन’कडून धमकी देण्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वागळे यांना सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, वागळे यांनी ही सुरक्षा घेण्यास नकार दिला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने सर्वसाधारण सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मला सुरक्षा पुरविण्यात येत असल्याचे सांगितले होते. मात्र, ही सुरक्षा ‘सनातन’ संस्थेच्या धमकीमुळेच  पुरविण्यात येत आहे का, याबाबत सरकारकडून काहीही सांगण्यात आले नसल्याचे वागळे यांनी म्हटले. मला ‘सनातन’ संस्थेकडून धमक्या मिळाल्या आहेत. चार वर्षांपूर्वी मी सूत्रसंचालन करत असलेल्या कार्यक्रमादरम्यान ‘सनातन’चे अभय वर्तक नाराज होऊन अचानकपणे उठून गेले होते. याशिवाय, गेल्याच आठवड्यात ‘सनातन’चे मुखपत्र असलेल्या ‘सनातन प्रभात’मध्ये माझ्याविरूद्ध लेख छापून आला होता. या लेखातून मला इशारा देण्यात आल्याची माहितीही वागळे यांनी दिली.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here