पुढारीचे पत्रकार नाथाभाऊ उंदरे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्या नजिक मांजरी येथील मटक्याच्या धद्याचे फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांना गुंडांनी शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे पत्रकार संतपप्त झाले आहेत.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब गोरे आणि पुणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष कांकरिया यांनी या दमदाटीचा आणि धक्काबुक्कीचा निषेध केला आहे.या प्रकरणी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे, घटनेंचं गांभीर्य विचारात घेत पोलिसांनी लगेच कारवाई केली आहे.