पत्रकार दिवंगत चन्द्रशेखर गिरडकर यांच्या मृत्यू ला
जबाबदार डॉकटर यांच्यावर कारवाही करा – आमदार प्रकाश गजभिये
तारांकित प्रश्नाद्वारे वेधले सरकारचे लक्ष
नागपूर : देशोन्नती मराठी पेपरचे पत्रकार दिवंगत चन्द्रशेखर गिरडकर यांचा अपघातात मृत्यू झाला, याला जबाबदार असलेल्या डॉकटरांवर त्वरित कारवाही करून ट्रक चालकाला अटक करावी, अशी मागणी आज विधानपरिषद सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी केली.
दिवंगत चन्द्रशेखर गिरडकर हे मागील वर्षी कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असतांना पंचशील चौक येथे ट्रक चालकाच्या हलगर्जी पणामुळे त्यांचा अपघात झाला. त्यांना मेंओ रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉकटरांनीं त्याच्याकडे दुर्लक्ष केले व त्याच्यावर योग्य उपचार न झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुख्यमंत्री महोदयांच्या मतदार संघात पत्रकारांनाही मृत्यू नंतर न्याय मिळत नाही, याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी खेद व्यक्त केला.