महाराष्ट्र सरकारने कालच 2013मधील पत्रकारिता पुरस्कारासाठी स्पर्धा जाहीर केलेली असली तरी 2012 च्या स्पर्धेमध्ये ज्या पत्रकारांनी भाग घेतला आहे त्या स्पर्घेचा निकाल अजून लागलेला नाही.त्यासाठी आता सरकारने पुरस्कार निवड समिती जाहीर केली आहे.ही समिती 2011-2012 च्या पुरस्कारासाठी नावे नक्की करील.सरकारने जाहीर केलेली समिती पुढील प्रमाणे

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे महासंचाल समितीचे अध्यक्ष असतील तर माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या संचालक समितीच्या सचिव असतील. समितीच्या नऊ अशासकीय सदस्यांपैकी सहा सदस्य मुंबईतील आहेत. एक नागपूरचा,एक पुण्याचा आणि एक औरंगाबादचा आहे.ग्रमीण भागातील एकही पत्रकार या समितीत नाही.ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारान काहीच समजत नाही असा सरकारचा होरा दिसतो.समितीमधील अशासकीय सदस्य असे
1) भूपेंद्र गणवीर- नागपूर
2) सुहास सरदेशमुख- औरंगाबाद
3) प्रकाश सावंत – मुंबई
4) मंदार पारकर – मुंबई
5) धर्मेद्र जोरे – मुंबई
6) इंदरकुमार जैन – मुंबई
7) शहीद लतिफ – मुंबई
8) प्रफुल्ल सोळुंखे – मुंबई
9) अभिजित घोरपडे – पुणे

LEAVE A REPLY