पाटोदाः राज्यातील पत्रकार आता एकजूट झाले आहेत.त्याचं वारंवार प्रत्यंतर येत आहे.काल रात्री पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील सरपंच पतीनं पाटोदा येथील पत्रकार दयानंद हरिभाऊ सोनवणे यांना मोबाईलवरून शिविगाळ करून धमकी दिली.सौताडा येथे पर्यटकांची कशी लूट होते यासंबंधीची बातमी सोनवणे यांनी दिली होती.त्यातून चिडून ही शिविगाळ केली गेली.या घटनेची बातमी अन्य पत्रकारांना समजताच सर्वांनी एकत्र येत पोलिसात तक्रार दिली.संबंधित सरपंच पतीविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.या घटनेचा निषेध बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सुभाष चौरे आणि मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी केला आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here