पत्रकाराला मारहाण

0
1300

आता बोला,विरोधात बातमी देणार असल्याच्या संशयावरून पत्रकाराला मारहाण

राजकीय पुढार्‍याच्या विरोधात बातमी दिली म्हणून पत्रकारांवर सर्रास हल्ले होतात,मात्र रत्नागिरी जिल्हयातील देवरूखमध्ये पत्रकार आपल्या विरोधात बातमी देणार असल्याच्या संशयानं एका शिवसेनेच्या स्थानिक पुढार्‍यानं पत्रकार संदीप गुडेकर याला मारहाण केल्याची घटना 4 मार्च रोजी घडली आहे.त्याबद्दल पत्रकारांमध्ये संतापाची भावना आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात संदीप गुडेकर आपल्या विरोधात बातमी देणार आहे,किंवा देत आहे अशा संशयानं पछाडलेल्या प्रसाद सावंत नावाच्या शिवसेनेच्या स्थानिक पुढार्‍यानं थेट तरूण भारतचं कार्यालय गाठलं आणि तेथे संदीप गुडेकर यांना मारहाण केली.खोटया गुन्हयात अडकविण्याची धमकी देण्याबरोबरच जिवे मारण्याचीही धमकी पत्रकाराला दिली गेली आहे.या संदर्भात गुडेकर यांनी देवरूख पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनेचा निषेध करीत असून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करीत आहेत..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here