पत्रकाराला कुटुंबासह जाळण्याचा प्रयत्न

0
683

पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून
सारया कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

अंगाचा थरकाप डविणारी येलदरी येथील घटना

जिंतूर : अलिबाग येथील पत्रकारावर आमदारांनी केलेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज पहाटे सव्वातीन वाजता जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील पत्रकार प्रवीण मुळी आणि प्रशांत मुळी या पत्रकारांच्या घरावर पेट्रोल ओतून त्यांच्यासह कुटुंबियांना जिवंत जाळण्याचा अत्यंत भीषण आणि अंगाचा थरकाप उडविणारा प्रकार घडला आहे.. प्रवीण मुळी हे गेली तीस वर्षे सामानाचे काम करीत असून प्रशांत मुळे लोकमतचे काम करीत आहेत.. दोघेही निस्पृहपणे, प्रामाणिक पत्रकार म्हणून तालुक्यात ओळखले जातात.. असं असताना सारया कुटुंबाला जाळून ठार मारण्याचा कट कोणी रचला याबद्दल परिसरात चचा॓ सुरू आहे..

पत्रकार प्रशांत मुळी यांच्या राहत्या घरात पहाटे सव्वा तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून आग लावली आग लागली त्या खोलीमध्ये कुटुंबातील सहा व्यक्ती झोपल्या होत्या परंतु वेळीच जाग आल्याने पुढील अनर्थ टळला
जिंतूर पासून पंधरा किलोमीटर अंतरावरील येलदरी येथे लोकमतचे पत्रकार प्रशांत मुळी यांचे कुटुंब राहते नेहमीप्रमाणे संबंधित कुटुंब राहत्या घरात झोपलेले असताना पहाटे सववातीनचया सुमारास अज्ञात व्यक्तीने घरातील मुख्य दरवाज्यावर पेट्रोल टाकले व त्यास आग लावून दिली अज्ञात व्यक्तीवर इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घराच्या मागील बाजूला पेट्रोल शिंपले संपूर्ण मुळी कुटुंबच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले होते परंतु सुदैवाने आग लागल्यावर प्रशांत मुळी यांचे बंधू प्रवीण मुळी यांना जाग आली त्यांनी आरडाओरडा केला.. त्यानंतर सारे कुटुंब जागे झाले आणि त्यांनी आग विझवली..दरवाजाच्या तीन फुटावर कुटुंबातील सर्व व्यक्ती झोपले होते पाच मिनिटे प्रवीण मुळी यांना जाग आली नसती तर….? संपूर्ण घरात पेट्रोल चा वास येत होता घटनेची माहिती बीट जमादार व पोलीस स्टेशनला देण्यासाठी दूरध्वनी लावला परंतु अधिकारी व पोलिसांनी फोन उचलला नाही घटनेनंतर तब्बल चार तासाने पोलीस घटनास्थळी पोहोचले फिर्यादीस उलट सुलट प्रश्न विचारून भांबावून सोडले दरम्यान या घटनेची फिर्याद प्रवीण मुळी यांनी जिंतूर पोलिसात दिली असताना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 432 नुसार गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ए एम खान हे प्रकरणाचा तपास करीत आहे
चोकट
** पोलिसांना गांभीर्य नाही*
येलदरी येथे मुळी कुटुंबावर एवढे मोठे संकट आल्यावरही घटनास्थळाला पोलीस निरीक्षक उपविभागीय पोलिस अधिकारी वा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली नाही दैव बलवत्तर म्हणून मुळी कुटुंब वाचले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असता परंतु घटना घडल्यानंतर ही पोलिसांना घटनेचे गांभीर्य वाटले नाही किंबहुना फिर्यादीस चार तास पोलिस स्टेशनला ताटकळत बसावे लागले
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषदेने या घटनेचा निषेध केला असून या भयंकर कटामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकाराची सीबीआयतर्फे चौकशी करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे..
निवडणूक काळाल आपणास अनुकूल बातम्या दिल्या नाहीत म्हणून सातत्याने असे प्रकार घडत असावेत असा संशय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.. सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.. सरकारने पत्रकारांचे बळी जाण्याची वाट न बघता कायदा अंमलात आणावा अशी मागणी देखील देशमुख यांनी केली आहे..

LEAVE A REPLY