ग्रामीण भागात पत्रकारांना कश्याप्रकारांना सामोरे जावे लागते याचे मासलेवाईक उदाहरण म्हणून खालील क्लीप मी मद्दाम येथे देत आहे,घटना बीड जिल्हयातील आहे.दिव्यअग्नि नावाचे दैनिक बीडमधून प्रसिध्द होते.या दैनिकाच्या कालच्या अंकात एक बातमी प्रसिध्द झाली होती.खोटया सह्या करून जयगाव ग्रामपंचायतीच्या उपसंरपंचपदी स्वतःच स्वतःची निवड करून घेणार्या बाबा शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवकाला दिले होते.ही बातमी दिव्यअग्निमध्ये प्रसिध्द झाली .त्यानंतर आरोपीने संपादक सूर्यकर यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या.शिंदे शिव्या देत होता आणि सूर्यकर केवळ निट बोल,निट बोल असे सांगत होते.त्याची ध्वनीफित येथे दिली आहे.आमच्या कायद्याच्या मागणीची टिंगल करणार्यांनी ही क्लीप मुद्दाम ऐकावी.-