शुक्रवारी दुपारची वेळ.चंडिगढमधील बंग भवन येेथे एका धार्मिक कार्यक्रमात सिंदूर खेलासाठी अनेक महिला रांगेत उभ्या होत्या.एवढ्यात आरतीने एका महिलेच्या साडीला आग लागली.बघता बघता साडीने चांगलाच पेट घेतला.तेथे उपस्थित राहून आपल्या वर्तमानपत्रासाठी फोटो काढणाऱ्या दैनिक भास्करच्या फोटो जर्नालिस्ट रवींदर भाटिया यांनी परिस्थितीचे गांभीर्य पाहून आपल्या जवळचा कॅमेरा बाजुला ठेवला आणि बाजुलाच असलेल्या खुर्चीचे कव्हर काढून त्यांनी संबंधित महिलेच्या साडीला लागलेली आग विझवायचा प्रय़त्न केला.त्यानंतर काही जण पुढे आले आणि महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विझविली.जखमी झालेल्या महिलेला नंतर रूग्णालयात दाखल करण्यात आले.महिलेची प्रकृती सुधारत आहे.एका पत्रकाराने महिलेचे प्राण वाचविल्यामुळे रविंदरचे सर्वत्र कौतूक होत आहे.केवळ घटनेचा वृत्तांत किंवा छायाचित्र देणेएवढेच आमचे काम नाही तर सामाजिक उत्तरदायित्वही निभावण्यास आम्ही मागे नसतो हे रविंदरने दाखवून दिले आहे.रविंदर भाटिया यांनी दाखविलेल्या माणुसकीचे आम्ही मनःपूर्वख अभिनंदन करीत आहोत.