पत्रकाराच्या तोंडावर पोलिसांनी केली लघुशंका

0
5019

पोलिसांकडून पत्रकाराला मारहाण; चेहऱ्यावरच केली लघुशंका

एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे.

शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा येथील पोलिसांनी एका पत्रकाराला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. एका वृत्तवाहिनीचे पत्रकार अमित शर्मा हे दिल्ली-सहारनपूर रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डब्बे घसरल्याचे वार्तांकन करण्यासाठी गेले होते. यावेळी दारूच्या नशेत असलेल्या पोलिसांनी शर्मा यांना बेदम मारहाण केली. शिवाय, मारहाण करत पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर शर्मा यांचे कपडे फाडले आणि त्यांच्या अंगावर पोलिसांनी लघुशंका केली, असा आरोप करण्यात येत आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी वृत्त प्रसारीत केले आहे. दरम्यान, या मारहाणीचा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागल्यानंतर उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी शामलीचे जीआरपी पोलिस निरीक्षक राकेश कुमार आणि एसएचओ संजय पवार यांना निलंबित केले आहे. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. कनौजिया यांनी ट्विटर आणि फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये एक महिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निवासस्थानाबाहेर काही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिसत आहे. यामध्ये ती म्हणते की, ‘मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना लग्नाचा प्रस्ताव पाठवला आहे.’ कनौजिया यांनी हा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत लखनऊमधील हजरतगंज पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हजरतगंज पोलिसांनी दिल्लीतून प्रशांत कनौजिया यांना अटक केली होती. या अटकेप्रकरणी कनौजिया यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती

LEAVE A REPLY