पंजाब सरकारच्या अनेक योजना बादल,मजिठिया ,कैरो परिवाराने ढापल्या.याबाबतच्या अनेक बातम्या लिहिणाऱे पत्रकरा दविंदर पाल यांच्या घरावर काल पेट्रोल बॉम्बचा हल्ला केला गेला.पंजाबी ट्रिब्युनमध्ये यासंंबंधीच्या बातम्या प्रसिध्द झालेल्या आहेत.दविंदर पालच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.हल्लयानंतर पत्रकारांच्या अनेक संघटना ट्रिब्युनच्या समर्थनार्थ समोर आल्या आहेत.या संघटनांनी घटनेचा निषेध केला आहे.चंदिगड प्रेस क्लबने हल्ल्याचा धिक्कार करताना पत्रकारांसाटी सुंरक्षण कायदा करण्याचीही मागणी केली आहे.प्रेस क्लबने राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली आहे

सत्तेवर आल्यानंतर बादल परिवाराच्या व्यावसायिक साम्राज्यात जी वाढ झालेली आहे त्याची पोलखोल द ट्रिब्युन ने केली आहे.राज्यातील अन्य पत्रकार संघटनांनी देखील घटनेचा निषेध केला आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्लयाचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY