पत्रकाराची आत्महत्या

0
786

नवी मुंबईत न्यूज नेशन टीव्हीसाठी काम करणारा हेमंत जाधव या तरूण आणि उमद्या पत्रकाराने आज आत्महत्त्या केली.त्यानं विषप्राशन करून जीवन संपविले.स्ट्रींजर म्हणून काम करणार्‍या हेमंतची आर्थिक ओढाताण होत होती.त्यातूनच हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले जात आहे.महाराष्ट्रातील पत्रकारांची अवस्था किती बिकट आहे हेच या घटनेतून दिसतंय.महाराष्ट्रातील असंख्य पत्रकारांची स्थिती अशीच असल्याने सर्व पत्रकारांना एकत्र येत ठोस काही करावं लागणार आहे.हेमंत जाधवच्या निधनाने मला धक्का बसला आहे.हेमंत जाधव यांना श्राध्दांजली

हेमंत जाधव यांच्या आत्महत्येची बातमी धक्कादायक आहे.आर्थिक कटकटीतून त्याने आत्महत्य केली असं सांगितलं जातं.हे जर खरं असेल तर पत्रकारांनी पेन्शनसाटी सरकारसमोर हात पसरू नयेत म्हणून फुटकचे सल्ले देणार्‍या मुंबईतील चार दोन वातानुकुलीन पत्रकारांनी आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.हेमंतचा विषय पेन्शनशी निगडीत ऩसला तरी तुटपुंज्या उत्पन्नामुळे पत्रकारांची कशी अन्नान्न दशा सुरूय हे त्यातून पुढे येते.सर्वांना हात जोडून विनंतीय की,आता तरी आपसातील मतभेद बाजुला ठेऊन आपण ठोस काही तरी भूमिका घेतली पाहिजे.केवळ तंगड्या ओढणे आणि फुकटचे श्रेय लाटणे हे उद्योग आता आपण बंद केले पाहिजेत.अन्यथा हा सिलसिला थांबणार नाही.मागच्या वर्षी मुंबईतील एका मोठ्या छायाचित्रकारासह राज्यातील चार पत्रकारांनी आत्महत्या केली होती.आता हेमंत जाधवने जीवन संपविले आहे.हे सारं चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here