पत्रकाराऐवजी आधार प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना अटक करा: एडवर्ड स्नोडेन

0
1590
  1. पत्रकाराऐवजी आधार प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना अटक करा: एडवर्ड स्नोडेन

‘आधार’ची माहिती ५०० रुपयांमध्ये विकली जात असल्याचे वृत्त देणाऱ्या ट्रिब्यून पत्रकारावर दाखल झालेल्या गुन्ह्याची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेतली जात आहे. अमेरिकन गुप्तचर संस्थेचा माजी हेर आणि अमेरिकेतील एनएसए म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या माहितीचा भांडाफोड करणारा गुन्हेगार एडवर्ड स्नोडेनने मोदी सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांऐवजी आधार प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना अटक करावी, असे स्नोडेनने म्हटले आहे.

ट्रिब्यून या वृत्तपत्राने ‘आधार’ची माहिती ५०० रुपयांमध्ये विकली जाते, असे वृत्त दिले होते. ‘आधार’चा माहिती संच उघड झाल्याच्या वृत्ताने देशभरात खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणाची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया’ने (यूआयडीएआय) थेट ‘द ट्रिब्यून’, बातमी देणाऱ्या पत्रकार रचना खैरा यांच्यावरच गुन्हा दाखल केला होता.

  • मंगळवारी एडवर्ड स्नोडेनने या वृत्तावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली. ‘आधार’ची गोपनीय माहिती उघड होत असल्याचे वृत्त देणाऱ्या पत्रकाराला पुरस्कार दिला पाहिजे. त्याची चौकशी व्हायला नको. जर सरकारला खरोखरच जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर कोट्यवधी भारतीयांची गोपनीयता भंग करणारे धोरण बदलावे. तुम्ही आधी यूआयडीएआयच्या अधिकाऱ्यांना अटक केली पाहिजे, असा सल्लाही त्याने सरकारला दिला.कापत्रकाराऐवजी आधार प्राधिकरणातील अधिकाऱ्यांना अटक करा: एडवर्ड स्नोडेनय होते वृत्त?

‘ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने ३ जानेवारी रोजी ‘आधार’बाबत वृत्त दिले होते. ट्रिब्यूनच्या पत्रकार रचना खेरा यांनी काही एजंट्सशी संपर्क साधला होता. या एजंट्सनी ५०० रुपयांमध्ये रचना यांना एक सॉफ्टवेअर आणि लॉग इन आयडी, पासवर्ड दिला. या सॉफ्टेवेअरवर लॉग इन केल्यावर कोणताही आधार क्रमांक टाकल्यावर त्याबाबतची माहिती मिळवणे शक्य झाले. आणखी ३०० रुपये दिल्यावर एजंट्सने रचना यांना आधार कार्ड प्रिंट करणारे सॉफ्टवेअरही उपलब्ध करुन दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here