पत्रकारांवरील हल्ले 2016   (८०)

हिंगोली,27 जानेवारी 2016

हिंगोली येथील आयबीएन लोकमतचे प्रतिनिधी कन्हैय्या खंडेलवाल यांच्यावर कोळसा येथील यांत्रेत व्यश्याव्यवसाय करणार्‍या महिलांनी हल्ला केला.व्यश्याव्यवसायाच्या विरोधात उपोषण कऱणार्‍यांची भेट घेऊन परतत असताना काही महिलांनी त्यांच्यावर हा हल्ला केला.या हल्लयाचा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.

नासिक ०५ फेब्रु वारी २०१६

मैत्रियचे एजंट्सकडून नाशिकचे पत्रकारांवर हल्ला व मारहाण महाराष्ट्र टाइम्सचे पंकज चांडोले, दिव्य मराठीचे प्रदीप मोरे व.न्यूज नाईनचे इस्हाक कुरेशी यांना मारहाण. जाहीर निषेध

 गंगाखेड दिनांक 09-02-2016 

परभणी जिल्हयाच्या गंगाखेड तालुक्यातील रानी सावरगाव येथील गाववालाचे प्रतिनिधी सुरेश सालमोटे यांनी विरोधात बातमी छापल्याबद्दल पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केल्याची तक्रार त्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.या प्रक ाराचा निषेध करीत आहोत.-

मुंबई- दिनांक 18-02-2016

न्यूज 24चे मुंबईतील प्रतिनिला रिपोर्टिंग करायला गेला असताना सायन हॉस्पिटलच्या बाऊन्सरनी मारहाण केली.त्याचा कॅमेरा काढून घेतला.याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे.

नांदेड दिनांक 21 फेब्रुवारी 2016

नांदेड येथील वीरशैव समाजाच्या आंदोलनाच्या वेळेस झी 24 तासचे कॅमेरामन संजय सूर्यवंशी यांना मारहाण .निषेध

मुबईः दिनांक 25-02-2016 

तुरूगातून सुटल्यानंतर सुनील दत्त सिध्दीाविनायकाच्या दर्शनासाठी येत असताना त्याचे छायाचित्र घेण्यासाठी तेथे जमलेल्या विविध माध्यमांच्या छायाचित्रकारांवर पोलिसांनी हल्ला केला.त्यांना पोंगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला

 घाटकोपर दिनांक 2 मार्च 2016 

विरोधात बातमी छापतो म्हणून दैनिक सकाळचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्या भावावर हल्ला.घाटकोपरच्या भटवाडीमधील घटना.7 गुडांनी लाठी आणि दगडाने मारले.जखमीला राजवाडी मधील रूग्णलयात दाखल केले.घाटकोपर पोलिसात गुन्हा दाखल-

जत दिनांक 4 मार्च 2016

जत येथील टीव्ही रिपोर्टर हरिश शेटे यांना सुभाष कोळी यांच्यासह जमावाने मारहाण केली.कॅमेरा फोडला.कोतवाल सुभाष कोळी यांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या रंगीत पार्टीच चित्रिकऱण करताना शेटे याना मारहाण करण्यात आली. एका बाजुला पाण्यासाठी आंदोलन करणार्‍या दुष्काळग्रस्तांच्या उपोषणासमोरच ही ओली पार्टी सुरू होती.रात्री 10 वाजता ही घटना घडली.

. भोकरदन दिनांक 08-03-2016

भाकरदन तालुक्यातील वालसा वडा येथील पत्रकार गजानन राऊत यांनी सकाळमध्ये दिलेल्या बातमीचा राग धरून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला.रात्रीच्या वेळेस काही जण त्यांच्या घरी आले आणि त्यांना मारहाण केली,गावातील अन्य लोकांनी त्यांची सुटका केली.याविरोधात तक्रार करण्यात आली आहे

घाटकोपर दिनांक 08-03-2016

घाटकोपरच्या एमजी रोडवर सराफा व्यापार्‍यांच्या मोर्चाचे कव्हरेज करणाऱे पत्रकार मनोज कुलकर्णी यांना गुलबाचंद झवेरी दुकानाचे मालक यांनी शिविगाळ आणि मारहाण केली.याची तक्रार टिळकनगर पोलिसात दिली आहे. पोलिसांनी एन.सी.दाखल केली आहे.

चंद्रपूर दिनाक 08-03-2016

चंद्रपूर येथील तुकुम परिसरातील एका उच्च प्राथमिक शाळेत बातमी संकलीत कऱण्यासाठी गेलेल्या एका प्रादेशिक वृत्त वाहिनीचे पत्रकार निलेश डहाट यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली आहे.याची तक्रार दुर्गापूर पोलिसांत करण्यात आली असून अ‍ॅड.खनके यांचयविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आङे

.

पथराड जि.जळगाव दिनांक 15-03-2016

धरणगावा तालुक्यातील पथराड येथील लोकमतचे वार्ताहर भगवान मराठे यांच्यावर चाकू हल्ला कऱण्यात आला.हल्लायचे कारण नक्की समजू शकले नाही.पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे.

पुणे दिनांक 16-03-2016

लॉर्ड बुध्दा वाहिनीचे वार्तार निशिकांत कांबळे यांना पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धक्काबुक्की केली.बंडगार्डन पोलिसांनी मारहाण केल्याचे कांबळे यांनी सांगितले.

मुंबई दिनांक 18 मार्च 2016

एबीपी माझाचे वार्ताहर ऋुत्विक भालेराव यांना कुर्ला स्टेशनवर पोलिसांची मारहाण

औंरंगाबाद दिनांक 18 मार्च 2016

औरंगाबाद  येथील दीव्य मराठीचे पत्रकार दिनेश हरे यांना औरंगाबादहून वडिगोद्रीला जाताना कंन्डक्टरने केली मारहाण

अहमदनगर दिनांक 19 मार्च 2016

अहमदनगर येथील छायाचित्रकार समीर मन्यार यांना छायाचित्र घेताना धक्काबुक्की,दमदाटी.जिल्हा रूग्णालयात हा प्रकार घडला.या संबधीची लेखी निवेदन वरिष्ठांना दिले गेले आहे.

उल्हासनगर दिनांक 20 मार्च 2016

उल्हासनगरमधील मी मराठीचे पत्रकार अजय दुधाणे यांना पोलिसांनी बेदम मारहाण केली.पवई चौकात लागलेल्या आगीचे वृत्तसंकलन करताना हा प्रकार घडला

औराद शहाजनी दिनांक 22 मार्च 2016

औराद येथील पुण्य नगरीचे पत्रकार दीपक थिटे यांच्यावर रेती माफियाकडून हल्ला.पुण्यनगरीत रेती माफियाबद्दल बातमी आल्यानंतर कलेक्टरांनी रेती उत्खनन बंद पाडले त्यामुळे चिडून हा हल्ला केला गेला.पोलीसात तक्रार.

शिरूर  दिनांक 29 मार्च 2016

पुणे जिल्हयातील शिरूर येथील पत्रकार आप्पासाहेब ढवळे यांना पोलिसांनी धक्काबुक्की आणि शिविगाळ केली.गुन्हयाची माहिती घेण्यासाठी ढवळे पोलिस ठाण्यात गेले असता हा प्रकार घडला.प्रकाश नेटके या पोलिस कर्मचार्‍यावर कारवाई करावी या मागणीसाठी पत्रकारांनी आज लाक्षणिक उपोषण केले.

आष्टी (जि,बीड) दिनांक  07-04-2004

आष्टी येथील सकाळचे पत्रकार अनिरूध्द धर्माधिकारी यांच्यावर आज वकिल हंबर्डे यांनी हल्ला केला.यावेळी देशपांडे यांच्या बंधूंनाही मारहाण केली गेली.बातमी का दिलीस म्हणत हा हल्ला केला गेला.या प्रकरणी आष्टी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

मालेगाव दिनांक 08-04-2016 

मालेगावयेथे निर्माण झालेल्या तणावाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले लोकमतचे वार्ताहर प्रवीण साळुंखे यांच्यावर जमावाचा हल्ला

बीड दिनांक 12-04ृ2016

पत्रकाराला वकिलाने केलेल्या मारहाणीची घटना ताजीच असताना बीड येथील लोकपत्रचे वार्ताहर अनिल घोरड यांना एका शिक्षकाने मारहाण केली आहे. सहलीची बातमी का दिली म्हणून ही मारहाण केली गेली आहे.

मालवण दिनांक 18-04-2016

.मालवण येथील पुढारीचे प्रतिनिधी परेश राऊत यांच्यावर आज प्राणघातक हल्ला झाला.त्यांच्यावर सुरीचे वारही कऱण्याचा प्रयत्न झाला.चेतन ज्ञानेश्‍वर मुळेकर हा व्यक्तीने हा हल्ला केल्याचे राऊत यांनी मालवण पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईदिनांक 18-04-2016

.नेरूळ येथील दीपिका बार वर पोलिसांनी कारवाई केली आहे.त्याची बातमी घेण्यासाठी नवी मुंबई आवाजच्या प्रतिनिधीवर हल्ला केला गेला.त्यांचे अपहरणही करण्याचा प्रयत्न झाला.या प्रकरणाची तक्रार नेरूळ पोलिसात दाखल दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पुणे दिनांक 18 एप्रिल 2016

सकाळचे बातमीदार आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष शाळीग्राम यांच्यावर शिक्षण आयुक्त कार्यालयात हल्ला करण्यात आला.बातमीसाठी ते शिक्षण आयुक्त कार्यालयात गेले असताना शिरसट नावाच्या इसमाने हा हल्ला केला..या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.


खामगावःदिनांक 21 एप्रिल 2016


खामगाव येथील पत्रकार काका रूपारेल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.बातमी छापल्याच्या रागातून हा हल्ला केला गेला.रूपारेल यांच्या कार्यालयासमोरच हा हल्ला झाला.रूपारेल यांच्या पायाला मार लागला आहे.रूपारेल यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झालेला होता.हल्लयाचा बुलढाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाने निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती देखील याचा – निषेध करीत आहे.-


बीड दिनांक 26 एप्रिल 2016


बीड येथील शासकीय रूग्णालयातील 4 रूग्णांचे डोळे गेले.त्यांना अंधत्व आले.याची बातमी घेण्यासाठी गेलेले लक्ष्मीकांत रूईकर,सामचे विकास माने आणि सामनाचे उदय जोशी यांना नेत्र विभाग प्रमुख संजय पाटील आणि त्यांचा सहाय्यक राजू नरवडे यांनी धक्काबुक्की केली.त्यांच्याकडील कॅमेरा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांना खोलीत कोंडण्याचाही प्रयत्न झाला. 


कोल्हापूर दिनांक 3 मे 2016


येथील टीव्ही-9 चे प्रतिनिधी अमोल पांढरे आणि सुनील काटर यांना चाटे ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्थेत मारहाण केली गेली.3 मे रोजी काही माहिती घेण्यासाठी ते संस्थेत आले असता त्यांना धक्काबुक्की आणि शिविगाळ केली गेली.भारत रामकृष्ण खराटे आणि इतरांनी ही मारहाण केल्याची तक्रार पत्रकारांनी पोलिसात दाखल केली असून खराटेच्या विरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे.त्यानंतर गैरसमजातून ही मारहाण झाल्याने आपण पत्रकारांची माफी मागतो असे लेखी पत्र खराटे यांनी दिले आहे.- 

पेठ दिनांक 13 मे 2016

पेठ तालुक्यातील पत्रकार राजेंद्र तख्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला.पोलिसात तक्रार दाखल- 

इंदापूर पुणे दिनांक 13 मे 2016

भीमा नदीतून होणारा बेकायदेशीर वाळू उपश्याची बातमी आणि छायाचित्र टिपण्यासाठी नदीकाठी गेलेले पत्रकार भारत पांडुरंग शेडगे ( रा.कालठाण) यांच्यावर वाळू माफियांचा हल्ला. अण्णासाहेब उर्फ बच्चन शिवाजी धोत्रे यांनी हल्ला केला.


फुलसावंगी  दिनांक 13 मे 2016

फुलसावंगी येथिल दै. देशोन्नतीचे युवा पत्रकार तानाजी शिंदे यांच्यावर गुटखा माफियाचा भ्याड हल्ला. LCB पथकाने शेख फैजान शेख खुर्शिद याचेकडून १८ हजार १९५ रू चा अवैध गुटखा विक्री करतांना पकडला होता. 3 मे रोजी की कार्यवाही झाली होती. पत्रकार तानाजी शिंदे यांनी या कारवाई बाबत बातमी देशोन्नती मधे प्रकाशित केली होती. बातमी का प्रकाशित केली म्हणून या गुटखा माफियाने शिंदे यांच्यावर आज हल्ला केला. दुकानात घूसून त्याने शिंदे यांना लाकडी बडग्याने अमानुष मारहाण केली. या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत आहे. घटनेची तक्रार महागाव पोस्टे ला दाखल केली असून तानाजी शिंदे यांना medical साठी रवाना करण्यात आले आहे.

शिरोळ दिनांक 13 मे 2013

शिरोळ येथे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षा रक्षकाकडून छायाचित्रकारास मारहाण.पाटील यांच्याकडून दिलगिरी मात्र पत्रकार संघाकडून निषेध 


मुंबई दिनांक 18 मे 2016 

ताज हॉटेल कर्मचाऱ्याची प्रेस फोटोग्राफरला मारहाण. ऍपल CEO टीम कुकचे फोटो काढताना केली मारहाण. मारहाणीच्या निषेधार्थ टीवी पत्रकार+फोटोग्राफर यांची ताज हॉटेल बाहेर निदर्शने आणि ठिय्या आंदोलन


पोलादपूर दिनांक 19 मे 2016 

येथील पत्रकार अनिल मोरे यांच्यावर हल्ला करण्यात आला.हल्ल्याचे कारण स्पष्ट झालेले नसले तरी बातमीच्या रागातून हा हल्ला झाल्याचे समजते.11 मे रोजी ही घटना घडल्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाची तक्रार घेतली नाही.


25 मे 2016 सोलापूर

सोलापूर येथील एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला पोलिसांची मारहाण.


खापरखेडा दिनांक 25 मे 2016

खापरखेडा येथील तरूण भारतचे पत्रकार श्रीकांत जालंधर यांच्यावर कोलमाफियांनी प्राणघातक हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.


भिवंडी दिनांक 5 जून 2016

येथील इनाडू इंडिया न्यूज पोर्टलचे संपादक सिध्दार्थ कांबळे यांनी भिवंडीतील कोनगाव येथील अनधिकृतरित्या सुरू असलेल्या बांधकामाची बातमी प्रसिध्द केल्यामुळे भूमाफियांनी त्यांच्या घरावर हल्ला चढवत त्यांना धक्काबुक्की केली.या प्रकरणी कोनगाव पोलिसात गुन्हा दाखल केला गेला आहे.


बारामती 5 जून 2016

बारामती येथील एका खासगी सावकाराने आपल्या आसामीला मारहाण केली.त्याचे चित्रिकरण करताना एका पत्रकारावर हल्ला केला


तेर जि.उस्मानाबाद दिनांक 6 जून 2016

तेर येथील सामनाचे वार्ताहर विजय कानडे यांना निकृष्ट बांधकामाची बातमी का दिलीस असे म्हणत राष्ट्रवादीचे पुढारी तसेच ठेकेदारानी मारहाण केली.कानडे जखमी झाले आहेत.आरोपींच्या विरोधात ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सुरगणा जि.नाशिक दिनांक 6 जून 2016

सुरगणा येथील दैनिक सकाळचे पत्रकार मंगळु गोविंदा चौधरी यांच्यावर हल्ला करण्यात आला.त्यात ते जखमी झाले आहेत. सुभाष रामू चौधरी आणि जगन सीताराम चौधरी यांनी आपल्यावर हल्ला केल्याची चक्रार मंगळू गोविंदा यांनी केली होती.त्यानुसार सुरगणा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मांजरी पुणे दिनांक 9 जून 2016

पुढारीचे पत्रकार नाथाभाऊ उंदरे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास पुण्या नजिक मांजरी येथील मटक्याच्या धद्याचे फोटो काढण्यासाठी गेले असता त्यांना गुंडांनी शिविगाळ करीत धक्काबुक्की केली.तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.त्या.या प्रकरणी लोणीकंद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे,

वाठोडा शुक्लेश्‍वर जिल्हा अमरावती दिनांक 17 जून 2016

वाठोडा येथील पत्रकार गजानन खोपे यांना त्यांच्या घरात घुसून दारू विक्रेत्यांनी मारहाण केली.त्यात ते जखमी झालेत.दारूच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली होती.त्याची टीप खोले यांनी दिल्याच्या संशयातून हा हल्ला केला गेला.आरोपी फरारी आहेत.

मुंबई दिनांक 3  जून 2016

मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या टॅक्सी चालकांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.ओला आणि ओबरच्या टॅक्सी सेवेवर निर्बंध आणण्याची मागणी करणार्‍या टॅक्सी चालकांनी या कंपन्यांच्या काही गाड्याची ंमोडतोड तर केलीच त्याच बरोबर तेथे असलेल्या झी मिडिया आणि इंडिया टीव्हीच्या गाड्यांची मोडतोड केली.तसेच तेथे छायांकन करणार्‍या काही छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे.


मुंबई दिनांक 29  जून 2016

झी चोवीस तासचे कॅमेरामन अमित गिरी यांना दादर पुर्व रेल्वे स्टेशन बाहेर शरद रसाळ नावाच्या ट्रॅफिक पोलीसाने केली धक्काबुक्की … ब्लु टॅक्सी गॅंग स्टोरी करत असताना … कॅमेरामनला केला मज्जाव केला. अणि स्टेशन बाहेरील चौकीत बसवून ठेवले… चॅनल आयकार्ड दाखवल्यावर देखील सोडले नाही … एवढचं नाही तर, टॅक्सीवाल्यांची स्टोरी का करतो ते मारतील असं १०-१५ टॅक्सी वाल्यांसमोर सांगून टॅक्सीवाल्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला…

यवतमाळ  दिनांक २ जून 2016

येथील एका शाळेत मुलीवर झालेल्या लैगिक अत्याचारानंतर तेथे उसळलेल्या जनक्षोभाची बातमी घेण्यासाठी गेलेले टीव्ही-9चे प्रतिनिधी विवेक गावडे आणि दैनिक सकाळचे प्रतिनिधी मनोज जैस्वाल यांच्यावर पोलिसांनी हल्ला केला.छायाचित्रण कऱणार्‍या कॅमेर्यांचीही मोडतोड करण्यात आली.


पुणे  दिनांक ३ जून 2016

पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका बातमीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी यांची बाजू समजून घेण्यासाठी एसआरएच्या कार्यालयात गेलेले महाराष्ट्र वन न्यूज चॅनलचे अश्‍विनी डोके आणि नितीन नगरकर यांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की तर केलीच शिवाय त्यांना तब्बल पाऊणतास डांबुन ठेवले गेले. त्याना अर्वाच्य भाषेत शिविगाळही करण्यात आली.पत्रकारांनी पोलिसांना पाचारण केल्यानंतर पत्रकारांची सुटका केली गेली.

पुणे  दिनांक ३ जून 2016

पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या एका बातमीच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लहू माळी यांची बाजू समजून घेण्यासाठी एसआरएच्या कार्यालबातमीत नाव छापले नाही म्हणून पत्रकारावर हल्ला

दौड दिनांक ५ जून 2016

 पुणे जिल्हयातील दौड येथील पत्रकार अब्बास शेख यांनी वीज चोरीबाबतची बातमी प्रसिध्द केल्यानंत महावितरणने संबंधित ग्राहकाची वीज चोरी पकडली.पत्रकारामुळेच आपण पकडले गेलोचा राग मनात धरून अब्बास शेख यांच्यावर हल्ला केला गेला.या हल्ल्यात त्यांचा भाऊ आणि चुलताही सहभागी झाले होते,.त्यांच्या आईलाही मारहाण केली गेल्याने त्यांची प्रकृत्ती खालावली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विनायक कांबळे यांच्यासह शहरातील पत्रकारांनी आज पोलिस निरीक्षकांची भेट घेऊन त्यांच्यावर आरोपींवर कारावाई करावी अशी मागणी केली आहे.ही घटना केडगाव येथे घडली.

विक्रोळी मुंबई दिनांक 14 जून 2016

विक्रोळी येथील अभय इंटरनॅशनल शाळेत पालकांनी फी वाढीच्या विरोधात केलेले आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेले झी-24 तासचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आणि महाराष्ट्र वन चे प्रशांत बढे यांना शाळेने कोंडून ठेवले आहे.पालकाच्या आंदोलनावर शाळेची भूमिका जाणून घेण्याचा हे पत्रकार प्रयत्न करीत असताना त्यांना प्रतिक्रिया देण्याऐवजी कोंडून ठेवले गेले.

 जत ( सांगली) दिनांक 7 जुलै 2016

सांगली जिल्हयातील जत येथील सकाळचे बातमीदार दत्ता सावंत यांच्यावर जीवघेणा हल्ला.माडगयाल येथील चारा छावणीत जनावरे मेल्याची बातमी छापल्यामुळे हा हल्ला झाला आहे

नागपूर 18 जुलै 2016 

नागपूरच्या हिंगणामधील आहित्याबाई होळकर आश्रम शाळेतील कथित गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी गेलेले महाराष्ट्र वनचे ब्युरो चीफ गजानन उमाटे,आणि कॅमेरामन सौरभ होले तसेच आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते आणि सुनील लोंढे यांना सस्था चालक श्रीकृष्ण मते यांनी मारहाण केली.यातून महिला पत्रकारही सुटल्या नाहीत.. 

कळंब दिनांक 25 जुलै 2016

मटक्याची बातमी छापल्यामुळे कळंब तालुक्यातील सौदना येथील पत्रकार परमेश्‍वर पालकर यांच्यावर मटका एजन्टांनी हल्ला केला .याबाबतची तक्रार कळंब पोलिसांत नोंदविल्यानंतरही आऱोपीच्या विरोधात एनसी दाखल करण्यात आली आहे.

मुंबई दिनांक 29 जुलै 2016 

झी चोवीस तासचे पत्रकार आणि डीएनएचे छायाचित्रकारास मालाड येथे मारहाण.फायरब्रिगेडच्या लोकांनी केली मारहाम 

शहापूर जिल्हा ठाणे दिनांक 2 ऑगस्ट 2016

शहापूर येथील पत्रकार प्रियेश जगे यांच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला केला गेला.पोलिसांत तक्रार दिली गेली आहे.

महाड दिनांक 4 ऑगस्ट 2016

महाड येथील सावित्रीवरील पूल वाहून गेल्यानंतर पाहणीसाठी आलेल्या प्रकाश मेहता यांना काही प्रश्‍न विचारणार्‍या साम टीव्हीच्या मिलिंद तांबे यांनी प्रकाश मेहता यांनी अरेरावी दाखविली तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांन त्याना धक्काबुक्की केली.सामचे संजय आवटे यांनी महाड एमआयडीली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्मयंत्र्यांची भेट घेतली.

सांगोला दिनांक 10 ऑगस्ट 2016

सांगोला येथील सांगोला नगरीचे संपादक सतीश सावंत यांच्यावर हल्ला.युवक कॉग्रेसची बातमी छापली होती त्यात कार्यक्रमास 35 लोकही नव्हते,कार्यक्रमास लोक का आले नाहीत याचं चिंतन करण्याची गरज आहे असं वाक्य असल्यानं चिडून हा हल्ला केला गेला.

भिवंडी दिनांक 18 ऑगस्ट 2016

भिवंडी येथील इंडिया न्यूजचे पत्रकार अनिल वर्मा यांना बेदम मारहाण करण्यात आली.बातमीवरून हा हल्ला केला गेला आहे. 

भिवंडी दिनांक 19 ऑगस्ट 2016

भिवंडी येथील पत्रकार अनिल वर्मा यांना सलमान नावाच्या व्यक्तीने बेदम मारहाण केली.दोन मुलांची भांडण सोडविण्यास गेलेल्या वर्मा यांच्यावर सलमानने हल्ला केला या प्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नांदेड दिनांक १९-०८-२०१६

नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी मित्रनगर परिसरात तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला गेला.

काल नांदेडमध्ये एक मर्डर झाला होता.त्याची बातमी कव्हर करण्यासाठी घटनास्थळावर गेलेेले खंडेलवाल यांना पाहून मागील बातमीचा राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला गेला.तू इथं कशाला आलास असे म्हणत हा हल्ला झाला.तीक्ष्ण हत्याराने खंडेलवाल यांच्या डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी हात आडवा आणल्याने डोक्यावर होणारा वार हातावर बसला.त्यामुळे हातााला मोठी जखम झाली असून त्यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार कऱण्यात येत आहेत.


लातूर दिनांक ३०-०८-२०१६

 येथील एका गरीब अॅटोरिक्षा चालकाच्या अॅटोरिक्षास पोलिस गाडीनेच धडक दिली व हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणुन त्या रिक्षा चालकाविरोधातच गुन्हा नोंदविला.हे अन्याय कारक प्रकरण मिटविण्यासाठी व झालेल्या चुकीचा जाब विचारण्यासाठी विवेकानंद नगर पोलिस ठाणे,लातुर येथे *दै.साहित्य संम्राटचे संपादक .पंडीत हणमंते* हे गेले असता या पोलिस ठाण्यातील पो.उप.निरीक्षक इंदोरकर यानी संपादक पंडीत हणमंते यांनी त्यांना मारहाण केली. 

कल्याण दिनांक 31 ऑगस्ट 2016 

झी -24 तासचे प्रतिनिधी आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका पत्रकार संघाचे सचिव विशाल वैद्य यांना 31 ऑगस्ट रोजी रात्री एका पोलिसाने मारहाण केली.ते शूटिंग करीत असताना त्याला विरोध करीत या पोलिसाने त्यांच्या छाताडावर बुक्कयांनी प्रहार केले-

पाथरी दिनांक 08-09-2016 

परभणी जिल्हयातील पत्रकार विठ्ठल भिसे या पत्रकारास त्याने बातमीत नाव छापले नाही म्हणून पंचायत समितीचे उपसभापती कोल्हे यांनी मारहाण केली.कोल्हे हे महाशय राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे स्थानिक पुढारी आहेत.

उस्मानाबाद दिनांक 6 सप्टेंबर 2016 उस्मानाबाद येथील पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर हल्ला करण्यात आला.गावकरीच्या कार्यालयावरही हल्ला केला गेला आहे.एक बातमी छापल्यामुळे हा हल्ला केला गेला आहे.नंतर सुनील ढेपे यांच्यावरच बलात्कार,विनयभंग,अ‍ॅट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली गेली.

उदगीर.दिनांक 6 सप्टेंबर 2016

उस्मानाबाद येथे सुनील ढेपे यांच्यावर हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच लातूर जिल्हयातील उदगीर येथील पत्रकार विनोद उगले यांच्या घरावर काल रात्री हल्ला केला गेला.त्यांच्या घरावर दगडफेक केली गेली आणि दाराची मोडतोड करण्यात आली.हल्लेखोरांनी त्यांच्या घराचे मेन गेटही तोडून टाकले आहे.तेथे उभे राहून त्यांना अर्वाच्च शिविगाळ केली गेली आणि धमक्याही दिल्या गेल्या.एवढं सारं झाल्यानंतर त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न होत आहे.बातमीच्या रागातून हे सारं घडलं असल्याचे समजतेय.-

पाथर्डी  दिनांक 7 सप्टेंबर

पुण्यनगरीचे शेगाव प्रतिनिधी कैलाश बुधवंत यांच्यावर रात्री 11 वाजता भाजपचे नगरसेवक कमलेश गांधी यांनी खुनी हल्ला केला गेला.त्यांची प्रकृत्ती गंभीर आहे.आरोपीवर गुन्हा दाखल


किन्हवली जि.ठाणे दिनांक 7 सप्टेंबर 

दैनिक पुढारीचे किन्हवली येथील वार्ताहर नितीन ठाकरे यांच्यावर खुनी हल्ला केला गेला.काही दिवसांपुर्वी ठाकरे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.त्याची फिर्याद त्यानी पिोलसांत दिली होती.त्यामुळे संतापलेल्या गुंडांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.


उस्मानाबाद दिनांक 8 सप्टेंबर 

येथील सकाळचे बातमीदार शिवाजी सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.देवधानोरा येथील सावंत यांच्याघरावर हल्ला करून त्यांना जखमी केले.दहा बारा जणांचा हा जमाव होता.पाणी वाटपाची बातमी त्यांनी प्रसिध्ध केल्याने हल्लेखोर चिडले होते.या हल्ल्यात त्यांच्या आई -वडिल,भाऊ बहिणींनाही मार लागला आहे. सावंत यांनी शिरढोण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मुंबई दिनांक 15 सप्टेंबर 2016 रणधीर कपूर आणि ऋुषी कपूर यांनी आज गणपती विसर्जन मिरवणुकीत पत्रकारास मारहाण केली.यावेळी त्यांनी चाहत्यांनाही मारहाण केली.नंतर त्याने पत्रकाराची माफी मागितली आहे.


सांगली दिनांक 15 सप्टेंबर 2016

पत्रकारांवर हल्ले होत होते,आता पत्रकारांच्या कुटुंबांवरही हल्ले होऊ लागल्याचे एक उदाहरण सांगली जिल्हयातील जत येथून समोर आलं आहे.जत येथील पुढारीचे प्रतिनिधी दिनराज वाघमारे यांच्या मुलावर दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात गुंडांनी प्राणघातक हल्ला केला आहे.ही घटना महसूल कॉलनीत येथे घडली.

केज  दिनांक 19 सप्टेंबर 2016

केजः तलावाच्या कामाची बातमी दिल्याबद्दल बीड जिल्हयातील केज येथील पत्रकार संतोष रोकडे यांना गुत्तेदाराने मारहाण केली करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी एनसी दाखल झाली आहे.या घटनेनंतर आता गुत्तेदारच रोकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचे समजते.पत्रकारांवर हल्ले करून त्याच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे प्रकार राज्यभर सर्रास होताना दिसत आहेत.

पुणे दिनांक 19 सप्टेंबर 2016

आरटीओ कार्यालयात पुढारीचे पत्रकार लक्ष्मण खोत वार्ताक॔नासाठी गेले होते. बातमीसाठी आरटीओ आवारातील काही फोटो काढत असताना, तेथे उपस्थित असलेल्या एंजटांचा जमाव एकत्र ऐवून त्यांनी पत्रकार लक्ष्मण खोत आणि फोटोग्राफर यशवंत कांबळे यांना घेरून शिविगाळ केली. त्यामधील जितू नावाचा एजंट आणि दुसरा एक अज्ञात एजंटाने खोत यांना धक्काबुक्की शिविगाळ देत मारहाण करायला सुरवात केली.

वाशी ,ठाणे दिनांक 27 सप्टेंबर 2016

 सामनाने मराठा समाजाची आणि महिलांची बदनामी केल्याचा आरोप करीत आज सामनाच्या वाशी येथील कार्यालयावर दगडफेक केली.या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेडने स्वीकारली आहे.ठाण्यातील सामना कार्यालयावर अज्ञातांनी शाई फेकली आहे.


पनवेल दिनांक 2५ ऑक्टोबर  2016

येथील कर्नाळा दैनिकाचे संपादक उन्मेष गुजराथी यांचेवर भ्याड हल्ला करण्यात आला ..त्यात ते जखमी झाले नाहीत .ते शिथापिणे सुटले 

विक्रोळी दिनांक १५ नोव्हेंबर 

झी -24 तासचे अमोल पेडणेकर,महाराष्ट्र वनचे प्रशांत बढे आणि सामनाचे संतोष पांडे यांच्यावर हल्ला.नोटांमुळे निर्माण झालेल्या गोंधळाचे कव्हरेज करताना हा हल्ला केला गेला.वरील तीन पत्रकारांनी विक्रोळी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.


मुंबई दिनांक 4 नोव्हेंबर 2016

टाटाचे सायरन मिस्त्री यांची छबी टिपण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन छायाचित्रकारांवर सुरक्षा रक्षकांचा हल्ला .त्यात टाइम्स ऑफ इंडियाचे संत कुमार,हिंदुस्थान टाइम्सचे अरजित सिंग,आणि मिड डे चे अतुल कांबळे गंभीर जखमी झाले.टाटाच्यावतीने नंतर माफीनामा जाहीर करण्यात आला.

भिवंडी दिनांक 18 नोव्हेंबर 

येथील पत्रकार सुनील लोणे यांच्यावर प्राणघातक हल्ला.

अंमळनेर दिनांक 26 नोव्हेंबर 2016

अंमळनेर येथील आयबीएन-लोकमतचे प्रतिनिधी सतीश गुलाबराव पाटील यांच्यावर 26 नोव्हेंबरच्या मध्यरात्री प्राणघातक हल्ला झाला.याची तक्रार पोलिसात दिली गेली आहे. 


पिंपरी-चिंचवड दिनांक 26 नोव्हेंबर 2016ो

चिचवड येथील आदित्य बिर्ला रूग्णालायतील मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमादरम्यान सुरक्षा रक्षकांनी कार्यक्रमाचं चित्रिकरण करणार्‍या पत्रकारांना धक्काबुक्की केली.त्याचा निषेध करीत पत्रकारांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.मुबईत टाटाच्या गार्डनी पत्रकारांना मारले आता बिर्लाच्या लोकांनी धक्काबुक्की केली. 

मुदखेड दिनांक ६ डिसेंबर २०१६

दलित वस्ती निधी बद्दल बातमी लावल्यामुळे गावगुंडानी रखमाजी शिंदे या ग्रामीण पत्रकारांवर रात्री ७:३०मुदखेड ते बारड दरम्यान निवघा पाटी जवळ रॅाड,गजाळी,काट्यानी गंभीर मारहान केली. यात उजव्या पायावर रॅाड मारला.आहे . या संदर्भात रात्री पोलिस स्टेशन मुदखेड मध्ये नोंद केली.मात्र तक्रार का केलास म्हणून परत सकाळी त्याच्या घरावर गावगुंडानी हल्ला केला.त्यात त्याचे भाऊ व परिवार गंभीर जखमी झाले आहेत

 विक्रमगड दिनांक 9  डिसेंबर २०१६

पालघर जिल्ह्याच्या विक्रमगड तालुक्यातील पुढारी व सामनाचे तरुण *पत्रकार ओमकार पोटे* यांच्यावर नितिन भोईर याने बातमीच्या रागातून भ्याड हल्ला केला आहे.*ओमकार पाटे* यांच्या कॉलरला पकडून तुम्ही पत्रकार फार मोठे लागून गेलेत का…? तुम्हाला कोणाला सोडणार नाही…अशी भाषा वापरत त्यांच्यावर हात उचलला..आणि मारहाण केली..


देऊळगावमाळी 24  डिसेंबर २०१६

दैनिक लोकमंथन च्या देऊळगावमाळी येथील पत्रकार कैलास हरिभाऊ राऊत यांना देऊळगावमाळी चे उपसरपंच विनोद फलके यांना बेदम मारहाण केली , तसेच बातमी छापल्यास हात पाय तोडून टाकेन किंवा जिवाने मारून टाकेन,अशी धमकी दिलीकैलास राऊत यांनी मेहकर पो स्टे ला तक्रार दाखल केली असुन पोलीसांनी विनोद फलके यांच्यावर 294,323,504 व 506 नुसार गुन्हे दाखल केला आहे

रेणापूर दिनांक 27 -12-2016

रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव येथील पुण्यनगरीचे पत्रकार नामदेव शिंदे यांना बाळू माफियांनी मारहाण केली.गुन्हा दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here