2017 मधील पत्रकारांवरील हल्ले 

थेट हल्ले 

 भूम जिल्हा उस्मानाबाद : शब्बीर कादर सापवाले  दिनांक 5 डिसेंबर 2017 

भूम येथील एकमतचे पत्रकार शब्बीर कादर सापवाले यांच्यावर चाकुहल्ला केला गेला.नगरपालिका शॉपिंग सेंटरमध्ये दुकानात औषधी घेत असताना गजानन चंद्रकांत बाराते याने शिविगाळ करीत त्यांच्यावर चाकुने वार केले.त्यात ते गंभीर जखमी झाले.मला ओळखत कसा नाहीस म्हणून ही मारहाण केली गेली.

कल्याण:केतन बेटावदकर 26 नोव्हेंबर २०१७

कल्याणमधील सिंधिकेट परिसरातील होलिक्रॉस हॉस्पिटलमध्ये एका 22 वषीर्र्य तरूणाचा मृत्यू झाल्यानंतर या हॉस्पिटलची मोडतोड करणार्‍या जमावाचे छायाचित्रण करणार्‍या पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला गेला.यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून एका खासगी रूग्णालायात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.-

निलंगा: सतीश मधुकर सरतापे :25 नोव्हेंबर २०१७


बातमी निलंगा तालुक्यातील सांगवी गावची आहे.तेथील ग्रामपचांयतीच्या उपसंरपंचाची काल निवड झाली.त्याची बातमी का देत नाही म्हणत पुण्यनगरीचे वार्ताहर सतीश मधुकर सरतापे यांच्या घरावर तुफान दगडफेक कऱण्यात आली,अर्वाच्च शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली गेली.सतीश सरतापे यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून आरोपींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.या घटनेचा तालुक्यात निषेध होत आहे.-


बदलापूर ःमहेश जगन्नाथ कामत 10 नोव्हेंबर २०१७


येथील पत्रकार महेश जगन्नाथ कामत यांना प्रचंड मारहाण करून त्यांची गाडी जाळण्यात आली आहे.या प्रकरणी पश्‍चिम बदलापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तुकाराम म्हात्रे आणि बंडया म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.कारला ओव्हरटेक करण्याच्या क्षुल्लक कारणांवरून हा प्रकार घडल्याचं सागितलं जातंय.–


ल्हासनगर ः श्रीकृष्ण मानकर दिनांक 06-11-2017

उल्हासनगर येथील पत्रकार श्रीकृष्ण मानकर यांनी अनधिकृत बांधकामाची माहिती पालिका आयुक्तांना दिल्याच्या रागातून त्याना कमलेश निकम यानी पालिकेसमोरच मारहाण केली.नंतर अन्य पत्रकारानी त्याची सुटका केली.या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


उल्हासनगर ःखुशाल अरविंद विसपुते 05-11-2017

उल्हासनगर येथील ग्रामीण पोलीसचे संपादक खुशाल अरविंद विसपुते यांना त्यांच्या घरासमोर राहणार्‍यांनी मारहाण केली.पोलिसात तक्रार दाखल केली गेली आहे.


नासिक : श्री.काशिनाथ हांडे ७ नोव्हेंबर २०१७

नासिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे खजीनदार व लखमापूर चे पत्रकार श्री.काशिनाथ हांडे यांना गंु डा करवी लोखंडी राॅडने मारहाण करण्यात आली त्यांना जखमी आवस्थेत मालेगाव येथील वैद्य हाॅस्पिटल मध्ये आय सी व्यू मध्ये दाखल करण्यत आले


मुंबईः इश्‍वर ताथवडे दिनांक 23 ऑक्टोबर 2017

मुंबई येथील अतिक्रणाची बातमी फेसबुक लाइव्ह करीत असताना इश्‍वर ताथवडे यांच्यावर हल्ला केला गेला.


हिंगोली ः नंदकिशोर तोष्णीवाल 23 ऑक्टोबर 2017

हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर 23 ऑक्टोबर 2017 रोजी कळमनुरी जवळ मसवड येथे हल्ला झाला.तीन मारेकरी आले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला.त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत.


धनसार-पालघर दिनाक 15 ऑगस्ट 2017 ः संजय सिंह

दहीहंडी फोडताना धनसारमध्ये रोहन किनी नामक तरूणाचे निधन झाले.त्याला रूग्णालायात दाखल केल्यानंतर तेथील छायाचित्रं काढताना जमावाने न्यूज 24 चे पत्रकार संजय सिंह यांच्यावर हल्ला करून त्याना बेदम मारहाण केली.

14 ऑगस्ट 2017,बदलापूर  महेश कामत,

बदलापूर विकासचे पत्रकार महेश कामत यांच्या कार्यालयात जावून तोडफोड आणि मारहाण करण्यात आली.तक्रार दाखल झालेली आहे.

5 ऑगस्ट 2017 मुंबई

मराठा क्रांती मोर्चाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावयास विधान भवनात आले असता,तेथील सुरक्षा अधिकारी प्रवीण पाटील यांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली,त्यांचे मोबाईल काढून घेण्याचा प्रयत्न केला.नंतर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले.

माजलगावः मिलिंद चोपेडे दिनांक 29 जुलै 2017 पीक विमा भरण्यासाठी लागलेल्या रांगांचे शुटिंग करीत असताना पोलिसांनी केला हल्ला .लोकाशाचे प्रतिनिधी मिलिंद चोपडे गंभीर जखमी

राजू काऊतकर ,कल्याण दिनांक जुलै 2017

पत्रकारांवरील हल्ल्यांना खंड नाही.कल्याणमध्ये आणखी एका पत्रकारावर हल्ला झालाय.राजू काऊतकर हे त्याचं नाव.ते महानायकसाठी काम करतात.चार दिवसांपुर्वी काही गुंड त्यांच्या घरी आले.त्यांना बेदम मारहाण केली गेली.त्यात ते गंभीर जखमी झालेत.

प्रताप कौसे,मेहकर दिनांक 5 जुलै 2017

मेहकर येथील देशोन्नतीचे पत्रकार प्रताप कौसे यांना मारहाण करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल त्यांचा अनन्वित छळ केला गेला


किशोर मेश्राम,देसाईगंज दिनांक 8 जुलै 2017

 देसाईगंज येथील देशोन्नतीचे पत्रकार किशोर मेश्राम यांच्यावर रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला करून त्यांना जखमी केले.कुरूड फाट्यावर हा प्रकार डला


जमीर शहा डोनगाव (जि.बुलढाणा ) 

बुलढाणा जिल्हयातील दैनिक पुण्यनगरीचे डोनगाव प्रतिनिधी जमीर शहा यांना दारू विक्रीची बातमी प्रकाशित केल्यामुळे दारू माफियांनी त्यांच्या घरावर हल्ला केला.त्यांना शिविगाळ आणि मारहणा केली.


भोकरदन ः मधुकर सहाने दिनांक 19-06-2017 ः

 भाकरदन येथील पत्रकार मधुकर सहाने यांच्यावर गुंडांनी जीवघेणा हल्ला केला.खोटे गुन्हे


नांदगाव जिल्हा नाशिक  दिनांक 10 जून 2017 

नांदगाव येथील लोकमतचे वार्ताहर संजीव धामणे यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला केला गेला.त्याच्या पायाचे हाड तुटले असून त्याच्यावर नाशिक येथील रूग्णालायात उपचार केले गेले.

पुणे दिनांक 10 जून 2017

पुणे येथील दैनिक सकाळचे छायाचित्रकार कैलाश गावडे मुंढवा भागात रस्त्यावर टाकलेल्या राडा-रोडाचे फोटो काढत असताना त्यांना ठेकेदारांच्या लोकांनी मारहाण केली.गुन्हा दाखल.आरोपींना अटक 

पुणे दिनांक 4 जून 2017

आयबीएन-लोकमतच्या प्रतिनिधी हलिमा कुरेशी आणि निखिल करंदीकर हे शेतकरी संपानंतरची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बाजाारात गेले असता त्याना संमाजकंटकांनी धक्काबुक्की केली.


सांगलीे दिनांक 4 जून 2017

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा बाईट घेण्यासाठी गेलेल्या वाहिन्यांच्या पतिनिधींना पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी धक्काबुक्की करून,तुम्ही कोणाला विचारून येथे आलात अशी दमबाजी केली.


नगर दिनांक 4 जून 2017

नगर जिल्हयातील लोकमतचे पाटील चिंचोटी येथील वार्ताहर अन्सार शेख शेतकरी संपाचे फोटो काढत असताना त्यांना पोलिसांनी मारहाण केली.तसंच त्यांना रात्रभर डांबून ठेवलं


लातूर दिनांक 31 मे 2017

सनी लिऑनील लातूरला आल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांना आपण बोल्ड चित्रपटात काम करता याबद्दल आपणास वाईट वाटत नाही का असा प्रश्‍न एका पत्रकाराने विचारला असता चिडलेल्या आयोजकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली.


पाथरी जि.परभणी दिनांक 28 मे 2017

पाथरी येथील राजकुमार गायकवाड यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला एका वकिलांने आणि त्याच्या भावाने हा हल्ला केला.


आंबेगाव जि.पुणे दिनांक 28 मे 2017

एका मृतदेहाचे चित्रिकरण करीत असताना आयबीएन-लोकमचे वार्ताहर रायचंद शिंदे यांना पीएसआय के.के,भालेकर यांनी मारहाण केली आहे.


सातारा ः प्रवीण कांबळे ः दिनांक 20 मे 2017 

पुणे-कोल्हापूर महामार्गावर तासवडे टोलनाक्यावरील कर्मचारी एका कारमधील कुटुंबाला मारहाण करीत असताना त्याचे चित्रीकरण करणार्‍या तरूण भारतचे पत्रकार प्रवीण कांबळेला टोलनाका कर्मचार्‍यांनी लाथाबुक्कयांनी मारहाण केली.या प्रकरणी पोलिसांनी मारूती लिंबे आणि रमेश वामन आमणे यांच्या विरोधात तळबीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.– 

कोराडी -नागपूर दिनांक 9 मे 2017

कोराडी येथील पत्रकार विनायक पुंड यांच्यावर ठाणेदार कदम यांनी हल्ला करून त्यांचा मोबाईल फोडला.याचा पत्रकारांनी निषेध केला.


कोरची (गडचिरोली ) ः राष्ट्रपाल नखाते ः दिनांक 26 एप्रिल 2017


गडचिरोली जिल्हयातील कोरची येथील तरूण पत्रकार राष्ट्रपाल नखाते यांच्यावर हल्ला केला गेला.एका युवतीच्या आत्महत्येसंबधी त्यांनी बातमी छापली होती.त्यातून युवतीच्या नातेवाईकांनी हल्ला केला.या हल्ल्याची चौकशी देसाईगंजचे एसडीपीओ करणार आहेत.नवीन पत्रकार संरक्षण कायद्यान्वये दाखल झालेला हा राज्यातील पहिला गुन्हा आहे.


माळशिरसः शौकत पठाण ःदिनांक 25 एप्रिल 2017

सोलापूर जिल्हयातील माळशिरस येथील पत्रकार शौकत पठाण यांच्यावर हल्ला केला गेला.बैलगाडी संदर्भात छापलेल्या बातमीतून हा प्रकार घडला.या प्रकरणाची एनसी दाखल झाली आहे.


दांडगुरी श्रीवर्धन ः श्रीकांत शेलार दिनांक 26 एप्रिल 2017

अवैध दारूचा सुळसुळाट,पोलिसांचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बातमी दिल्याबद्दल श्रीकांत शेलार यांना मारहाण करण्यात आली.त्याची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.


सोलापूर, संजय पाठक दिनांक 21 एप्रिल 2017

: दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक संजय पाठक यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करीत त्यांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार शुक्रवारी मध्यरात्री घडला. प्रशांत सुभाष पवार (वय 26, रा. 660, दक्षिण कसबा, चौपाड, सोलापूर) असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक करुन न्यायालयात उभे केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

नागपूर ः राहूल भडांगे,दिनांक 21 एप्रिल 2017

नागपूर येथील लोकमतचे उपसंपादक राहूल भडांगे यांच्यावर येथील अंबाझरी तलावाजवळ अज्ञात तरूणांनी हल्ला केला.त्यांची मोटरसाईकल लुटण्याचा प्रयत्न केला.याबाबत प्रतापनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

कमलाकर सोनकाबळे अक्कलकोट दिनांक 20 एप्रिल 2017 

सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट येथील कमलाकर सोनकांबळे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.त्यांना रूग्णालायात दाखल केले गेले आहे.

पाटण किशोर गुरव दिनांक 19 एप्रिल 2017 

रस्त्याच्या निकृष्ट कामाचे सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यामुळं संतापलेल्या ठेकेदारानं पत्रकार किशोर गुरव यांच्या  घरी जावून त्यांना बेदम मारहाण केली.संदीप चंद्रकांत कोळेकर असे आरोपीचे नाव आहे.सर्व पत्रकारांनी एकत्र येत आवाज उठविला आहे.


औरंगाबाद दिनांक 14 एप्रिल 2017 संतोष देशमुख

औरंगाबाद येथील दीव्य मराठीचे शहर प्रतिनिधी संतोष श्यामराव देशमुख डॉ.आंबेडकर जयंतीचे वृत्तसंकलन संपवून घरी परतत असताना त्यांच्यावर अज्ञात इसमाने हल्ला केला.याबाबत पोलिसात तक्रार दिली गेली आहे.


सुधीर सूर्यवंशी ,पनवेल दिनांक 27 मार्च 2017 

 मुंबईतील डीएनएचे पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.खारघर येथे हा हल्ला झाला.सोसायटीच्या वादातून हा हल्ला झाल्याचे सांगितले जाते.आरोपींना अटक केली गेली आहे.

साकीनाका,अंधेरी- मुंबई दिनांक 11-03-2017

अनधिकृत बांधकामाची तक्रार दिल्यानंतर त्यावर महापालिकेनं कारवाई करून ते बांधकाम उद्धस्त केल्याच्या रागातून पत्रकार संजय गिरी यांना काही गुंडांनी मारहाण केली.त्यांची आई आणि बहिणालाही मारहाण केली गेली आहे.याची तक्रार साकीनाका पोलिसांत दिली गेली आहे.

देवरूख ( जि.रत्नागिरी) दिनांक 6 मार्च 2017

देवरूख येथील तरूण भारतचे पत्रकार संदीप गुडेकर हे आपल्या विरोधात बातमी देणार आहेत या संशयाने पछाडलेल्या शिवसेनेच्या प्रसाद सावंत यांनी तरूण भारतच्या कार्यालयात जावून गुडेकर यांना मारहाण केली.या संबंधिची तक्रार देवरूख पोलिसात दिली गेली आहे.


संतोष गायकवाड- सोलापूर दिनांक 06-03-2017

सोलापूर येथील क्राईम अंकुश साप्ताहिकाचे संपादक यांच्यावर खुनी हल्ला झाला.जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळच हा प्रकार घडला.मारेकर्‍यांनी संतुच्या सहाय्यानं हा हल्ला केला.हल्ल्याचे कारण समजू शकले नाही.


स्वाती नाईक,संदीप भारती दिघा दिनांक 2 मार्च 2017

झी-24 तासच्या प्रतिनिधी स्वाती नाईक आणि व्हिडीओ जर्नालिस्ट संदीप भारती यांच्यावर दीघा येथे काही गुंडांनी हल्ला केला.अनधिकृत बांधकामावर कारवाई सुरू असतानाचा वार्तांकन करताना हा प्रकार घडला.संदीप भारती या हल्ल्यात जखमी झाला.त्याच्यावर उपचार केले गेले.या प्रकरणी नऊ जणांना अटक केली गेलीय.

वसंत माने भाईंदर 1 मार्च २०१७ 

भाईंदर येथून प्रकाशित होणाऱ्या “राजसत्ता” या वृत्तपत्रात व्यंगचित्र प्रकाशित केल्याचा राग मनात धरून भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी पोलिसांच्या संरक्षणात आपल्या कार्यकर्त्यासह संपादक वसंत माने यांच्या घरावर हल्ला केला आणि तोडफोड करीत माने व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी स्थानिक पत्रकारांनी करूनही गेले दोन दिवस पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांनी कोणतीच दखल घेत नाही हे कळताच क्षणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मराठी पत्रकार परिषद, मीरा- भाईंदर महापालिका वार्ताहर संघाने २४ तासाच्या आत हल्लेखोरांवर कारवाई केली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा दणका देताच पोलीस प्रमुखांनी रात्री उशिरा आमदार मेहता व त्यांच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करून घेतला हा पत्रकार एकजुटीचा विजय आहे.

नागपूर-सोलापूरमध्ये पत्रकारांवर हल्ले २३ फेब २०१७

कालच्या निवडणूक निकालाच्या गडबडीत पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिल्या.पहिला प्रकार सोलापुरात घडला.मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली.त्यानंतर सर्व पत्रकारांनी ठिय्या आंदोलन वगैरे केले मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिध्दी मिळाली नसल्यानं हा प्रकार जनतेपर्यंत गेलाच नाही.नागपूरमध्येही टाइम्स ऑफ इंडियाचे विलास देशपांडे आणि विलास धिराज यांना मारहाण झाल्याची बातमी आहे.या दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असून हल्लेखोरांवर कारवाई कऱण्याची मागणी करीत आहे.

 दिंद्रुड विकास अशोक काटकरदिनांक 18 जानेवारी 2017

राज्यातील पोलीस आपली मर्दुमकी गुंड- माफियांच्या विरोधात दाखविण्याऐवजी पत्रकारांवर हल्ले करून दाखवित आहे.सांगोल्यातली घटना ताजी असताना आता माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील अपंग पत्रकार विकास अशोक काटकर यांना पोलिस अधिकार्‍यांनी बेदम मारहाण तर केलीच त्याच बरोबर त्याला पोलीस ठाण्यापासून एक किलो मिटर दूरवर नेऊन सोडून दिले.काटकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात असा आरोप केला आहे की,गाडीतून नेऊन पोलिसांनी आपल्याला जबरदस्तीने दारू पाजली.https://goo.gl/qQ7i6P.

सागोला -मधुकर भुसे दिनांक 18 जानेवारी 2017                                                            

  सागोला येथील पत्रकार सचिन मधुकर भुसे यांना आज मंगळवेढा येथील डीवायएसपी दिलीप जगदाळे यांनी प्रचंड मारहाण केली.मारहाणीमुळे भुसे यांना चक्कर येऊन ते खाली पडले अशी तक्रार त्यांनी विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे केली आहे.

बुलढाणा दिनांक 6 जानेवारी 2017

बुलढाणा येथील देशोन्नतीचे प्रतिनिधी गणेश निकम केलवदकर यांना दामिनी पथकाच्या प्रमुख शहा यांनी मारहाण केली.देशोन्नतीत आलेल्या एका बातमीचा विषय काढून कार्यालयातच ही मारहाण झाली.तक्रारी नंतर डीवायएसपी श्‍वेता खेडेकर यांनी दामिनी पथख प्रमुख शहा यांचा पदभार काढून घेतला आहे.पत्रकार दिनीच झालेल्या या प्रकाराने पत्रकार संतप्त झाले आहेत.

कोल्हापूर दिनांक 3 जानेवारी 2017

कोल्हापूर येथील एका शाळेतील एका विद्यार्थीनीनं शुल्क न भरल्याने तिला तीन दिवस वर्गाबाहेर बसविण्यात आले होते.त्याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या झी न्यूजचे प्रतिनिधी प्रताप सरनाईक यांना आणि त्यांच्या छायाचित्रकारास पााचार्यांची धक्काबुक्की.

कांदिवली मुंबई दिनांक 2 जानेवारी 2017

मुंबई -आयबीएन लोकमतचे पत्रकार आशिष राणे यांच्यावर हल्ला.दीपक बोरकर आणि त्यांच्या साथीदारांनी कांदिवली म्हाडा वसाहतीत घुसून केला हल्ला.आशिष कदम आणि पुजा बोरकर यांनी विवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे.

ज्ञानेश भुकेले ,पुणे दिनांक 17 डिसेंबर 2017

पुण्यानजिक मांजरी येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहातील आंदोलनाची बातमी कव्हर करीत असताना आणि आंदोलनाचे छायांकन करीत असताना लोकसत्ताचे वार्ताहर ज्ञानेश भुकेले यांना पोलीस सहाय्यक उपायुक्त निलेश मोरे यांनी मारहाण करून त्यांच्याकडून जबरदस्तीनं माफीनामा लिहून घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here