राजस्थानातील झुंझुनू येथील पत्रकारांवरील हल्ल्ले गेल्या काही दिवसात चिंता वाटावी एवढे वाढले आहेत.सुरजगढ येथील पोट निवडणुकीत पराभूत झाल्याने भाजप उमेदवार डॉ.दिगंबर सिंह यांच्या समर्थकांनी माध्यमांना टार्गेट करायला सुरूवात केली आहे.या अगोदर विद्यार्थी संसदेच्या निवडणुकांच्या वेळेसही पत्रकारांना टार्गेट कणऱ्यात आलं होतं.राजस्थानात पत्रकारांना टोल लागू नाही असे असतानाही टोल नाक्यावर पत्रकारांवर हल्ले होत आहेत.हे सारे हल्ले नियोजनबध्द पधद्तीनं होत असल्याचा पत्रकार संघटनांचा आरोप आहे.हल्ले करताना वरिष्ठ पत्रकार टार्गेट होत आहेत.या हल्ल्याच्या विरोधात उद्या मंगळवारी झुंझुनू बंदचे आवाहन पत्रकारांनी केले असून आनंदाची गोष्ट अशी की,शहरातील विविध सामाजिक संघटना,आणि व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला आहे.