मुम्बई दि19 – महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यात चिंतनीय वाढ झाली आहे.पत्रकारांवरील हल्ला म्हणजे लोकशाहीवरील हल्ला आहे लोकशाहिचा चौथा स्तम्भ असणाऱ्या पत्रकारांचे संरक्षण करणे शासनाचे काम असून पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांचे प्रमाण पाहता पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मंजूर झालाच पाहिजे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष लोकनेते खासदार रामदास आठवले यान्नी केली आहे
मिरभईन्दर येथील पत्रकार राघवेन्द्र दुबे यांची नुकतीच हत्या करण्यात आली या हत्येचा रिपब्लिकन पक्षाने तीव्र निषेध केला आहे दिवंगत पत्रकार राघवेन्द्र दुबे yaanchya निवासस्थानि आज रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यान्नी आज भेट देवून शोकाकुल दुबे परिवाराचे सांत्वन केले रिपाइंतर्फे2लाख सांत्वनपर मदत यावेळीदेण्याचे आठवलेंनी जाहिर केली
दिवंगत पत्रकार राघवेन्द्र दुबे हत्येची सीबीआय चौकशी करण्याची तसेच दुबेन्च्या कुटुंबियांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून25 लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रिय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज केली या साठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे आठवलेंनी प्रसिद्धिमाध्यमांना कळविले आहे