पत्रकारांना  पुरस्कारासाठी  आवाहन

0
971

 अलिबाग दि.21 :-  महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम प्रभावी व यशस्वीपणे राबविण्यासाठी पूरक व प्रबोधनात्मक बातम्यांच्या माध्यमातून मोहिमेला प्रसिध्दी देणाऱ्या वृत्तपत्रांच्या बातमीदार, स्तंभलेखक आणि मुक्त पत्रकारांना पुरस्कार देण्यासाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.  प्रवेशिका सोमवार दिनांक 30 जून 2014 पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग यांनी केले आहे.

        महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या प्रसिध्दीसाठी बातमीदारांनी प्रचार व प्रसारासाठीचे लिखाण दिनांक 2 मे 2013 ते 1 मे 2014 या कालावधीत प्रसिध्द केलेले साहित्य पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येतील.   पुरस्कारासाठी वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले टिकात्मक लेख, वृत्तांकन, बातम्या, अग्रलेख, फोटो फिचर्स या साहित्यांचा विचार करण्यात येईल.  पारितोषिकासाठी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत प्रसिध्द केलेल्या साहित्याचा विचार करण्यात येईल.  एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा अर्ज संपादकामार्फत स्वीकारण्यात येईल.  जर एका वर्तमान पत्राच्या एका आवृत्तीतील एका पेक्षा जास्त पत्रकार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांनी केलेल्या अर्जापैकी एकाच पत्रकाराच्या साहित्याची निवड करुन संबंधित वृत्तपत्राचे संपादक जिल्हा समितीकडे अर्ज पाठवतील.  वृत्तपत्र बातमीदाराचे साहित्य अनेक वृत्तपत्रातून प्रसिध्द झालेले असेल तर त्या सबंधिचा एकत्रित अर्ज त्या संपादकापैकी कोणत्याही एका संपादकाने जिल्हा समितीकडे पाठवावा.  जिल्हास्तरीय पारितोषिकासाठी जिल्ह्यातून प्रसिध्द होणारी वृत्तपत्र, नियतकालिके यामधून प्रसिध्द झालेले साहित्य विचारात घेण्यात येईल. प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकारास संबधित आवृत्तीत प्रसिध्द झालेल्या साहित्या संदर्भात अर्ज करता येईल.  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अ, ब, क, वर्गातील जिल्ह्यातील वृत्तपत्र आणि नियतकालिकात प्रसिध्द झालेल्या साहित्याचाच विचार पुरस्कारासाठी करण्यात येईल.  प्रत्येक जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे विभागीय स्तरावरील पारितोषिकासाठी आपोआप नामनिर्देशन होईल तसेच प्रत्येक विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या पत्रकारांचे राज्यस्तरावरील पारितोषिकासाठी आपोआप नामनिर्देशन होईल.  प्रवेशिका विहित नमुन्यात तीन प्रतीत जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, नवरे बिल्डींग, पाध्येवाडी, बँक ऑफ इंडियाच्या समोर अलिबाग ता.अलिबाग जि.रायगड येथे सादर कराव्यात, असेही आवाहन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here