सरकार विरोधात लिखाण करणार्‍या अनेक पत्रकारांना पोलिसांच्या नोटिसा

आणीबाणीची चाहूल

जनहिताची आणि पर्यायानं सरकार विरोधी भूमिका घेणारे अनेक पत्रकार पोलिसांच्या रडारवर आहेत ,हे पत्रकार कुठे जातात,कोणाशी बोलतात यावरही पोलिसांचे लक्ष्य आहेच.आतापर्यंत ही पाळत गुप्तपणे ठेवली जात होती मात्र आता सरकार विरोधी भूमिका घेणार्‍या आणि विशेषत्वाने नरेंद्र मोदींच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट टाकणार्‍या पत्रकारांना तसेच राज्यातील काही नेटिझन्सला सायबर सेल आणि पोलिसांनी नोटिसा बजावल्याने आपली वाटचाल पुन्हा एकदा आणीबाणीच्या दिशेनं तर सुरू नाही ना ? अशी रास्त शंका घेतली जात आहे.भारतीय दंड संहितेच्या कलम 149 अंतर्गत या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.’सोशल मिडियावर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याची माहिती प्राप्त झाली असून यामुळे शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.आपल्याकडून कोणताही अनुचित प्रकार किंवा कृत्य घडून सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई कऱण्यात येईल’ असा मजकूर या नोटिसीमध्ये आहे.या नोटिशींना मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितिीने जोरदार आक्षेप घेतला असून ही अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्याची गळचेपी असल्याचे मत या संघटनांनी प्रसिद्दीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.आता बातमी देण्यासाठी किंवा सोशल मिडियावर व्यक्त होण्यासाठी  पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार आहे काय असा प्रश्‍नही या पत्रकात विचारण्यात आला आहे.राज्यातील ज्या पत्रकारांना अशा पध्दतीच्या नोटिसा आलेल्या आहेत त्यांनी मराठी पत्रकार परिषदेशी संपर्क साधावा असे आवाहन कऱण्यात आले आहे..–

धनंजय मुंडे यांचा आरोप

सोशल मीडियावर लिहिणाऱ्या पत्रकारांना पोलिसांनी नोटीसा पाठवल्या असून ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी आहे. पत्रकारांना बोलावणे आणि चौकशीच्या नावाखाली धमकावणे ही तर दुसऱ्या आणीबाणीची चाहूल आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला.

सोशल मीडियावर आपली मतं मांडणाऱ्या काही पत्रकारांना सायबर क्राईमने नोटिसा पाठवल्या असून येत्या तीन दिवसात सायबर क्राईम पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास सांगितले आहे. पत्रकारांना सायबर क्राईम ब्रान्चने पाठवलेल्या नोटिसानंतर धनंजय मुंडे यांनी सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करीत हल्ला चढवला आहे. राज्यातील महागाई, बेरोजगारी व मंत्र्यांचे भ्रष्टाचार याविरुद्ध जनआक्रोश दडपून टाकण्यासाठी सरकारकडून पोलिसी बळाचा गैरवापर सुरू आहे. सोशल मीडियावरील टीकेने सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिला आहे. यामुळे त्यांची पोलखोल झाली आहे. पत्रकारांच्या मागे चौकशीचा ससेमीरा लावणे ही आणीबाणीची भीषण चाहूल आहे, असे मुंडे यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.

1 COMMENT

  1. Modine social mediacha upyog prachara sathi kela hota. Ani jevhade media walyanna apya khishyat ghyayche hote tepan ghetle. Pan 2019 Javal ahe mhanun ha Sara prapanch.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here