मूर्तीजापूर येथील डॉ.राजेश कांबे पॉलिटेक्निक कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली.या घटनेची नोंद पोलिसात झाल्यानं त्याच्या बातम्या सर्वच वृत्तपत्रांनी प्रसिध्द केल्या.या बातम्यांमुळे संस्थाचालक राजेश कांबे यांची पित्त खवळले आणि त्याने आपल्या फोनवरून पत्रकार निलेश पिंजरकर आणि अन्वर खान या दोन पत्रकाराना हातपाय तोडण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.तुम्हाला गावात राहणे मुश्किल करू असाहा दम भरला गेला आहे.या प्रकरणाची तक्रार मूर्तीजापूर पोलिसात दिली गेली असून कथित शिक्षण समा्राटाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाची गंभीर दखल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने घेतली आहे.