मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकऱण्याची मागणी
मुंबई-गोवा महामार्गाच्या दुस़़ऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी बुधवारी कोकणातील दोऩशेवर पत्रकारांनी महत्वाचा कशेडी घाट अडवून तीव्र निदर्शने केली.आंदोलनाचे नेतृत्व पत्रकार हल्ला विरोधई कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केेले.पोलिसांनी 40 पत्रकारांना अटक करून नंतर त्यांना सोडून दिले.आंदोलन पूर्णतः यशस्वी झाल्याचा दावा आंदोलक पत्रकारांनी केला आहे.
यावेळी एस.एम.देशमुख यांनी आंदोलक पत्रकारांना मार्गदर्शन केले.ते म्हणाले, मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपरीकरण करावे यामागणीसाठी कोकणातील पत्रकार 2008पासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहेत.आंंदोलनातील सातत्य आणि सततच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारने पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू केलं आहे.हे काम 33 टक्के पूर्ण झाले असले तरी काम मंद गतीने सुरू असल्याने निर्धारित वेळेत हे काम पूर्ण होणे शक्य नाही.त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघातांमध्ये वाढ झालेली आहे.दुसऱीकडे इंदापूर ते संगमेश्वर या दुस़ऱ्या टप्प्याच्या कामाबद्दल शासकीय पातळीवर काहीच हालचाल नसल्याने या महामार्गाचं राज्यातील अन्य महामार्गाप्रमाणं कधी चौपदरीकरण होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.अरूंद रस्ते,वळणाचे मार्ग आणि वाढलेली वाहतूक यामुळे या महामार्गावर दररोज सरासऱी दीड माणसाचा बळी जातो.पाच जण जखमी होतात.हे सारे थांबवायचे असेल तर चौपदरीकऱण झाले पाहिजे असे एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.महामार्ग झाला तर अपघात तर थांबतीलच त्याचबरोबर कोकणाच्या विकासालाही चालना मिळेल आणि हा महामार्ग कोकणाच्या विकासाचा महामार्ग ठरेल असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला.महामार्गाच्या चौपदरीकऱणाचे काम पूर्ण होईपर्यत पत्रकारांचा दबाब कायम राहिल असेही यावेळी स्पष्ट कऱण्यात आले.यावेळी संतोष पवार,विजय पवार यांचीही भाषणे झाली.
आपल्या भाषणात एस.एम.यांनी महामार्गामुळे जे विस्थापित होणार आहेत त्यांना सिडको प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर पॅकेज मिळले पाहिजे अशीही मागणी केली.महामार्गासाठी रायगडमधील भूमीपूत्रांनी फारसा विरोध न करता आप्या जमिनी,घरे दिलेली आहेत. अशा स्थितीत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजीही कोकणातील पत्रकार घेतील असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
आजच्या आंदोलनात मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,माजी अध्यक्ष अभय आपटे,मनोज भागवत,प्रवीण कुलकर्णी,दीपक शिंदे,भारत रांजनकर यांच्यासह रायगड आणि रत्नागिरीतील पत्रकार उपस्थित होते.पत्रकारांच्या या रस्तारोको मुळे जवळपास तासभर घाटात वाहतूक कोंडी झाली होती.यावेळी पोलिसांनी चाळीस पत्रकारांना अटक करून पोलादपूर पोलिस ठाण्यात नेले.नंतर त्यांची सुटका कऱण्यात आली.