26 मार्च रोजी अकोल्यात पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन

0
705
पत्रकारांचे जिल्हास्तरीय अधिवेशन 26 मार्च रोजी
अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघाचा उपक्रम
 
अकोला – मराठी पत्रकार परिषद संलग्नीत अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने रविवार दि.२६ मार्च २०१७ रोजी पत्रकारांच्या जिल्हा अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व.ब्रजलाल बियाणी नगर, मा.ब्रा.संस्कृत विद्यालय, गणपत शर्मा भवन, निमवाडी अकोला येथे आयोजीत असलेल्या जिल्हा अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. अधिवेशन तयारीचा आढावा घेण्यासंदर्भात सोमवार दि.२० मार्च रोजी दु.१ वाजता पत्रकार भवनात पत्रकार संघाचे तालुका प्रमुख, पदाधिकारी व अधिवेशन समितीचे सदस्य यांची महत्वपूर्ण बैठक आयोजीत करण्यात आली आहे.
 
अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा अधिवेशनाची जय्यत तयारी करण्यात येत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन कृषि व फलोत्पादन मंत्री ना.भाउसाहेब पुंâडकर यांच्या हस्ते होत असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख भुषविणार आहेत. सकाळी १० वाजता प्रारंभ होणाNया उद्घाटन सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, आय.बी.एन.लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, एन.डी.टी.व्ही.चे वरिष्ठ पत्रकार प्रसाद काथे, माहिती व जनसंपर्वâ विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार, विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष अनिल अग्रवाल, परिषदेचे विभागीय सचिव राजेंद्र काळे,खा.संजय धोत्रे, आ.गोवर्धन शर्मा, आ.रणधिर सावरकर, जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्यानंतर दुपारी २.३० वाजता द्वितीय सत्राला प्रारंभ होणार आहे. द्वितीय सत्र परिसंवादाचे आहेत. पत्रकारीतेसमोरील आव्हाने व उपाय या परिसंवादात आय.बी.एन.लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे, एन.डी.टीव्ही.चे वरिष्ठ संपादक प्रसाद काथे, दै.देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, माहीती विभागाचे संचालक देवेंद्र भुजबळ, दै.सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, दै.लोकमतच्या अकोला आवृत्तीचे निवासी संपादक रवि टाले ह्यांचा व्याख्याते म्हणून सहभाग राहणार आहे.
जिल्हा अधिवेशनाचे समारोपीय सत्र दुपारी ४ वाजता प्रारंभ होईल. समारोपीय सत्राला विशेष अतिथी म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.रणजीत पाटील उपस्थित राहतील. या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आ.गोपीकिशन बाजोरीया, आ.प्रकाश भारसाकळे, आ.बळीराम सिरस्कार, आ.हरिश पिंपळे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील ह्या प्रभुती उपस्थित राहतील. अकोला जिल्हा पत्रकार संघाच्या या जिल्हा अधिवेशनात पत्रकारांच्या विविध समस्या व प्रश्नांवर चर्चा व मंथन होणार आहे. पत्रकारांचे प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या ह्ष्टीकोणातून आयोजीत असलेल्या या जिल्हा अधिवेशनाला अकोला जिल्ह्यातील समस्त पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर व अधिवेशन आयोजन समितीने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here