विक्रोळी येथील अभय इंटरनॅशनल शाळेत फी वाढीच्या विरोधात पालकांचे सुरू असलेले आंदोलन कव्हर करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रक ारांना शाळेने डांबून ठेवले होते.झी-24 तासचे अमोल पेडणेकर आणि महाराष्ट्र वनचे प्रशांत बढे असे या दोन पत्रकारांची नावे आहेत.पालकांच्या आंदोलनांतर शाळेची भूमिका जाणून घेण्याचा हे पत्रकार प्रयत्न करीत असताना त्याना पकडून शाळेने कोंडून ठेवले.मात्र या संबंधीची सूचना पोलिसांना दिल्यानंतर शाळेने सपशेल माफी मागितली आणि पत्रकारांना सोडून दिले.पत्रकारांची माफी मागण्याची आजच्या दिवसातली ही दुसरी घटना.नांदेडमध्ये पत्रकाराला शिविगाळ करणार्या अधिकार्याने माफी मागितली होती.आता शाळेने माफी मागितली आहे.-