महाराष्ट्रातील बहुतेक मुख्यमंत्र्यांनी माहिती आणि जनसंपर्क विभाग स्वतःकडं ठेवलेला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील ही परंपरा खंडित होऊ दिलेली नाही.ही एकच गोष्ट सरकारच्या दृष्टीनं हा विभाग किती महत्वाचा आहे हे अधोरेखित कऱणारी आहे.सरकारची धोरणं,सरकारचे निर्णय आम जनतेपर्यत पोहोचविण्याचं आणि माध्यमं आणि जनतेशी संवाद साधण्याचं माध्यम म्हणूनच या विभागाकडं पाहिलं जात हे जरी खरं असलं तरी हा विभाग सरकारच्या अपेक्षांना खरं उतारलाय असं दिसत नाही.यालाही सरकारच जबाबदार आहे असं म्हणावं लागेल.कारण या विभागाकडं सरकारनं कधी काळजीनं पाहिलंच नाही.विभागाचे प्रश्न किवा दुःखही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही.त्यातून बिनकामाचा विभाग किंवा पांढरा हत्ती असंच या विभागाचं आजचं स्वरूप झालेलं आहे.ते बदलावं आणि या विभागात आलेलं नैराश्य दूर करीत हा विभाग पळायला कसा लागेल यादिशेनं प्रयत्न होतात असं दिसत नाही.विभागाचं परंपरागत स्वरूप बदलून हा विभाग हायटेक कऱण्याच्या दृष्टीनंही फारसा प्रयत्न होताना दिसत नाही.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचा महासंचालक हा आयएएस अधिकारी असतो.कोणताही आयएएस अधिकारी महासंचालक व्हायला फारसा उत्सुक नसतो.आल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून बदलीसाठी महासंचालकाचे प्रयत्न सुरू होतात.त्यामुळं आपणास जायचंच आहे या जाणिवेनं तो अधिकारी या विभागाच्या दुखण्यामध्ये फार लक्ष घालतच नाही.या विभागाचे विषय समजून घ्यायलाही तो रस दाखवत नाही.विभागात चालणाऱ्या राजकारणामुऴं अनेक अधिकाऱ्यांना कधी येथून सटकतो असं झालेलं असतं.त्यामुळं एक वर्षाच्या आतच आपली कारकिर्द सपवून अनेक अधिकारी निघून गेल्याचे खाली दिलेल्या महासंचालकाच्या कारकिर्दीवरून आपल्या लक्षात येईल.मनिषा पाटणकर-म्हैसकर सोडल्यातर आपला कार्यकाळ एकाही महासंचालकानं पूर्ण केल्याचं दिसत नाही.भूषण गगराणी जवळपास अडिच वर्षे होती.या दोन्ही अधिकाऱ्यांना बराच कालावधी मिळाल्यानं त्यांनी नक्कची चांगंलं काम केलं.भूषण गगराणी यांच्या काळात महाराष्ट्रात मराठी पत्रकर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं पत्रकार प्रशिक्षण शिबिर सुरू झाली,पत्रकार पुरस्कार योजनाही विविध विभागातील मान्यवर पत्रकारांच्या नावे सुरू केली गेली.इतरही अनेक महत्वाचे निर्णय गगराणी यांच्या काळात झाले.गगराणी पत्रकारांशीही चांगले ंसंबध प्रस्थापित करून चांगला पायंडा पाडला होता.मनिषा पाटणकर यांन ीलोकराज्यला घरोघरी पोहचविण्याचं मोठं काम केलं.अधिस्वीकृती समिती,जाहिरात धोरण विषयक काही निर्णय त्यांनी घेतले.त्याचा नक्तीच फायदा झाला.पण आतापर्यत झालेल्या 27 महासंचालकांपैकी बहुतेकांचा कार्यकाळ अल्पजिवी ठरल्यानं विभाग उघड्यावर पडल्या सारखा झाला. सध्या मुंबईत या विभागाची अवस्थाही वाईट आहे.वृत्त शाखा एका ठिकाणी ,जाहिरात शाखा भलत्याच ठिकाणी,लोकराज्या आणखी तिसरीकडे,महासंचालक एका बिल्डिंगमध्ये बसणार तर सचिव दुसरीकडे ही सारी स्थिती समन्वय साधण्यासाठी आणि परस्पर संपर्क साधण्यासाठी जशी अवघड आङे तशीच ती आपली कामं घेऊन येणारे पत्रकारांसाठीही जिकरीची आहे.त्यांना इकडून तिकडे चकरा मारत बसावे लागते.कोणाचा पायपोस कोणात नाही असेच हे चित्र आहे.सरकार आणि विभाग यांच्यातही समन्वय राहिला नाही.त्यामुळं संचालकाच्या काही जागा रिक्त आहेत.पुण्यासारख्या महत्वाच्या विभागातील उपसंचालकपद गेली काही महिने प्रभारी अधिकाऱ्याकडं आहे.अनेक जिल्हयात जिल्हा माहिती अधिकारी हे पद तृतिय श्रणी अधिकारीच सांभाळतात. त्यामुळे हे अधिकारी केवळ संबंधित जिल्हयातील जिल्हाधिकाऱ्याची चमचेगिरी करण्यातच दिवस घालवत असतात. सरकारची प्रतिमा सकारात्मक बनवावी असा प्रय्तनच होताना दिसत नाही.जिमाकाकडं असलेली यंत्रणा हा नेहमीच चर्चेचा आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्याची गाडी हा त्या त्या जिल्हयातील पत्रकारांच्यादृष्टीने टिंगलीचा विषय झालेला असतो.वर्षानुवर्षे हेच चित्र आहे.एक काळ असा होता की,जिल्हयातील पत्रकार माहिती विभागाकडून घरपोच केल्या जाणाऱ्या फोल्डरवर विसंबून असायचे आज अनेकांना जिल्हा माहिती कार्यालय कुठं असतं हे ही माहिती नसते.त्यामुळं या विभागाची गरज संपली आहे काय ? असा प्रश्न उपस्थित होतो.प्रकाश जावडेकर यांनी केंर्दीय माहिती आणि प्रसाऱण मंत्रालय बंद करण्याचं सुतोवाच केलंय.राज्याच्या बाबतीतही हाच निर्णय घेण्याची वेळ तर आली नाही ना असाही सवाल आहे.कारण या विभागाचा ना सरकारला फायदा,ना जनतेला लाभ ना पत्रकारांना काही उपयोग.
त्रकारांचे प्रश्न या विभागाशी जोडले गेलेले आहेत.साधे साधे प्रश्नही हा विभाग सोडवू शकत नाही.माहिती आणि जनसंंंंंपर्क विभागाच्यावतीनं जे पुरस्कार दिले जातात त्या पुरस्काराचे गेल्या चार वर्षांपासून वितऱणच झालेले नाही.जीवन गौरव पुरस्कार मान्यवर पत्रकाराला दिला जातो.तो ही दिला गेलेला नाही.दरवर्षी पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवायचे,निकालही जाहीर करायचे पण ते पुरस्कार द्यायचेच नाही हे कृत्य पत्रकाराच्या फसवणुकीचे ठरते या विरोधात कोणी तक्रार दाखल केली तर विभागाची अडचण होऊ शकते.अधिस्वीकृती समिती होऊच नये असे काही अधिकाऱ्यांना वाटत असते.त्यादृष्टीनं त्याचे प्रयत्न असतात.त्यासाठी मुख्यमंत्र्यांना भिती दाखविली जाते.सरकारी कोट्यातल्या नावावरून तुम्ही अडचणीत याल असंही सांगितलं जातं.त्यामुळं मुख्यमंत्री निर्णयच घेत नाहीत.पाच वर्षे झाली ही समितीच नाही.लोकशाहीत सारा कारभार अधिकारीच बघतात.तो किती निःपक्षपातीपणे चालत असेल यावर वेगळं भाष्य करण्याचं कारण नाही.पत्रकार भवनाचे प्रश्न,जाहिरात धोरणाचे प्रश्नही सोडविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही.मजिठिया आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचा आदेश सर्वोच्चा न्यायालयाने दिलेला आहे.असं असतानाही अऩेक दैनिकांनी तो लागू केला नाही.तो लागू झालेला आहे की नाही हे पाहण्याची आणि श्रणिक पत्रकारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी देखील याच विभागाची असतानाही हे काहीच होत नाही.त्यामुळं हा विभाग बिनकामाचाच झाला आहे.त्यामुळं िस्थिती अशी आहे की,हा विभाग स्वतःचेच प्रश्न सोडवू शकत नसेल तर तो पत्रकारांचे प्रश्न क से सोडवू शकणार हा प्रश्न आहे.
खाली आतापर्यतचे महासंचालक आणि त्यांचा कार्यकाळ दिलेला आहे.यावरून वाचकांना अंदाज येईल की,काय अवस्था आङे ते..
Ǜी. शिशकांत दैठणकर 28.8.1980 TO 31.7.1981
2 Ǜी. िवनोद राव 1.8.1981 28.3.1982
3 Ǜी. एच.एस. नरगुंड 29.3.198 2 4.5.1982
4 Ǜी. ए.एम. देवÎथळे 28.5.1982 12.10.1982
5 Ǜी. मोहन पाटील 13.10.1982 27.6.1984
6 Ǜी. शांताराम सगणे 27.8.1984 5.1.1986
7 Ǜी. Ģमोद माने 13.2.1986 30.6.1989
8 Ǜी. सुरेश साळवी 28.7.1989 7.5.1990
9 Ǜी. अǗण पाटणकर 13.6.1990 28.2.1993
10 Ǜी. अिजत वटȓ 14.7.1993 13.2.1994
11 Ǜी. िगिरश गोखले 14.2.1994 12.8.1994
12 Ǜी. पी.डी. करंदीकर 13.8.1994 21.5.1995
13 Ǜी. िगिरश गोखले 22.5.1995 10.6.1996
14 Ǜी. अिजत वटȓ 11.6.1996 9.12.1996
15 डॉ. िनतीन करीर 9.12.1996 12.3.1997
16 कॅ Ãटन अशोक देशपांडे 2.5.1997 20.9.1998
17 Ǜी. आनंद िलमये 21.9.1998 14.6.1999
18 डॉ. संजय चहांदे 17.6.1999 27.3.2000
19 Ǜीमती नीला स¾यनारायण 27.3.2000 31.3.2001
20 Ǜी. भूषण गगराणी 1.4.2001 16.9.2003
21 Ǜी. िनितन गğे 16.9.2003 31.5.2004
22 Ǜी. भूषण गगराणी 1.6.2004 21.6.2006
23 Ǜीमती मनीषा पाटणकर-Çहैसकर 12.6.2006 2.7.2009
24 Ǜीमती Ģाज¯ता लवंगारे-वमɕ 7.7.2009 11.10.2010
25 Ǜी. िवजय नाहटा 11.10.2010 31.12.2011
26 Ǜी. Ģमोद नलावडे 31.12.2011 24.2.2014
27 Ǜी. ĢÊहाद जाधव (अ.का.) 24.2.2014 आजतागायत