पत्रकारांचा राज्यभर डीआय़ओ कार्यालयांना घेराव आंदोलन यशस्वी,समितीतर्फे पत्रकारांचे आभार

0
753
मुंबई दिनांक -17 ( प्रतिनिधी ) पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा आणि पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी या आणि अन्य 9 मागण्यांसाठी महाराष्ट्रातील पत्रकारांनाी आज राज्यातील डीआय़ ओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन केले. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली होती.राज्यातील सर्वच्या सर्व म्हणजे 35 जिल्ह्यात आंदोलन यशस्वी झाल्याचा दावा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केला आहे.
राज्यातील पत्रकारांवर सातत्यानं हल्ले होत आहेत.राज्यात दर पाच दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत आहे.दुर्दैवाने सरकारला हे हल्ले थांबविण्यात  अपयशी ठरले आहे.त्यामुळे पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी राज्यातील पत्रकार गेली पाच वर्षे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली करीत आङेत.मात्र पत्रकार संरक्षण कायदा असो किंवा पत्रकार पेन्शन योजनेची मागणी असो सरकार सातत्यानं  पत्रकारांच्या मागण्यांची उपेक्षाच करीत आहे. याचा निषेध करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त करण्यासाठी आज राज्यातील डीआयओ कार्यालयांना घेराव घालण्याचे आंदोलन करण्यात आले.ते सर्वत्र यशस्वी झाले.
मुंबईत पत्रकारांनी माहिती महासंचालकांची भेट घेऊन सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे करीत असलेल्या दुर्लक्षांबद्दल आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.पुण्यातही शंभरावर पत्रकारांनी एकत्र येत जिल्हा माहिती कार्यालयासमोर उग्र निदर्शऩे केली.राज्यात नगर,रायगड,नंदूरबार,नांंदेड,वाशिम,अकोला,बीड,लातूर,कोल्हापूर,औरंगाबाद,उस्मानाबाद,जळगाव,पऱभणी,हिंगोली,रत्नागिरी,
सांगली,सातारा आदि जिल्हयासह सर्वच जिल्हयात आंदोलन यशस्वी झाले आहे.
ठिकठिकाणी पत्रकारांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयसमोर जमा होऊन निदर्शऩे केली,डीआयओ कार्यालयांना घेराव घालून काही काळ काम बंद पाडले आंादोलनानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडे निवदने देण्यात आली.ठरल्या प्रमाणे सर्वत्र आंदोलन शातंतते पार पडली.
पुणे येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी बोलतान समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी सरकारने कायदा आणि पेन्शनबाबत तातडीने निर्णय़ घेतला नाही तर यापेक्षा अधिक उग्र आंदोलन कऱण्याचा इशारा दिला.पत्रकाराना संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी वारंवार रस्त्यावर यावे लागते ही बाब सरकारला शरम वाटावी अशी आहे.त्यामुळे आता सरकारने पत्रकारांचा जास्त अंत न बघता पत्रकाराचे प्रश्न तातडीने सोडवावेत अशी मागणी त्यांनी  केली. भक्कम एकजूट दाखवत राज्यातील पत्रकारांनी आंदोलन यशस्वी केल्याबद्दल देशमुख यांनी विविध पत्रकार संघटना तसेच तमाम पत्रकारांना धन्यवाद दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here