महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्लयाच्या घटना नव्या वर्षात देखील थांबायचं नाव घेत नाहीत.जानेवारीत सात पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवडयात परभणी जिल्हयातील जिंतूर तालुक्यातील बामणी येथील पत्रकार राजू देशमुख यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गावगुंडांनी हल्ला चढविला.एका सत्कार समारंभात झालेल्या तुंबळ भांडणाचे नावासह वार्तांकन केल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.शुक्रवारी रात्री काही गावगुंड आठच्या सुमारास राजू देशमुख यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्यांच्या पत्नीसहा राजू देशमुख यांच्यावर हल्ला केला.केवळ बातमी दिल्याच्या रागातून हा हल्ला झाला आहे.

या हल्ल्याचा निषेध परभणी,हिंगोलीसह राज्याच्या विविध भागातून होत आहे.महाराष्ट्र पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती देखील या हल्लयाचा निषेध करीत असून फडणवीस सरकारने मागच्या सरकारसारखी आश्वासनं देत न बसता आता तातडीने पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी समिती क रीत आहे.परभणी जिल्हयात गेल्या वर्ष-दोन वर्षात पंधरा ते वीस पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.दोन वर्षापूर्वी पुर्णेतील एका पत्रकारावर ऍसिड हल्ला झाला होता.या प्रकऱणातील आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here