रायगड प्रेस क्लबच्यावतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार यंदा जय महाराष्ट्र वाहिनीचे संपादक निलेश खरे यांना जाहीर करण्यात आला आहे.पाच हजार रूपये रोख,मानपत्र ,सन्माचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 22 तारखेला प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष पेऱणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात आज ही माहिती देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून नावलौकिक मिळविलेल्या रायगड प्रेस क्लब संघटनेचा वर्धापन दिन २२ मार्च रोजी साजरा होत आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात राज्यस्तरावरील तरुण संपादकाचा आणि जिल्ह्यातील पत्रकारांचा सन्मान पुरस्कार देऊन केला जातो. यावर्षी आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कार जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे यांना जाहीर करण्यात आला आहे .वाहिन्यांमधील आघाडीचे नाव असलेले निलेश खरे यांचे आचार्य अत्रे युवा संपादक पुरस्कारासाठी संघटनेचे संस्थापक एस एम देशमुख यांनी खरे यांचे नाव निश्चित केले.
रायगड प्रेस क्लबच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरव केला जातो . यावर्षी जिल्ह्यातील पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. सर्व पुरस्कारांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते त्यातून नावे निश्चित करण्यात आली. पेण येथे झालेल्या रायगड प्रेस क्लबच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सर्व अर्जाचा विचार करून जिल्ह्यातील पुरस्कार निश्चित करण्यात आले.प्राप्त झालेले अर्ज यांचा विभागवार विचार करून रायगड प्रेस क्लबच्या जिल्हा कार्यकारिणीने पुरस्कार निश्चित करण्यात आले.
रायगड जिल्ह्यातील पुरस्कार ——————————————-
@जेष्ठ पत्रकार- आप्पा देसाई -रोहा
@स्व.प्रकाश काटदरे निर्भीड पुरस्कार- सुनील पोतदार- पनवेल
@स्व. सतीश चंदने सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार- मंगेश माळी -अलिबाग
@स्व.अमोल जंगम युवा पत्रकार पुरस्कार —
१-प्रशांत पोतदार – श्रीवर्धन
२- मिलिंद कदम-माथेरान
३- विकास मिरगणे -कर्जत
@सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार -आरती म्हामूणकर – माणगाव
@छायाचित्रकार पुरस्कार -मनोज कळमकर-खालापूर
यांना पुरस्कार जाहीर करण्यात येत असून या सर्व पुरस्कारांचे वितरण २२ मार्च रोजी होणाऱ्या रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे . आचार्य अत्रे राज्यस्तरीय युवा संपादक पुरस्काराचे स्वरूप हे ५०००चा धनादेश,सन्मानचिन्ह,मानपत्र,शाल आणि श्रीफळ असे स्वरूप आहे . तर जिल्हा स्तरीय अन्य सर्व पुरस्कार साठी रोख रक्कम ,सन्मानचिन्ह,मानपत्र ,शाल ,श्रीफळ असे स्वरूप असणार आहे. वर्धापन दिन कार्यक्रमात संघटनेची लेखणी हि स्मरणिका प्रकाशित केली जाणार असून ,यावर्षी पर्यावरण या विषयाला वाहिलेली हि स्मरणिका असणार आहे .
रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार देखील रायगड प्रेस क्लबच्या वर्धापन दिन कार्यक्रमात देण्यात येणार आहेत. यामध्ये सूर्यकांत पाटील -पेण ,संजय भुवड -महाड, अरुण पोवार- माणगाव यांना श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम,सन्मानचिन्ह,मानपत्र शाल श्रीफळ असे असणार आहे.
आपले–
संतोष पेरणे-अध्यक्ष,
भारत रांजणकर-कार्याध्यक्ष,
राजेंद्र जाधव-उपाध्यक्ष,
विजय मोकल-सचिव,
अनिल भोळे-खजिनदार
तसेच सर्व संघटक,पदाधिकारी, सदस्य