नवी दिल्ली :ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांना 2018 सालासाठीचा कुलदीप नय्यर पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित केले जात आहे. दिल्लीतील गांधी शांती प्रतिष्ठानच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो.. गेल्या वर्षी हा पुरस्कार रविश कुमार यांना देण्यात आला होता. 20 एप्रिल रोजी दिल्लीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
निखिल वागळे यांनी महानगराच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेला नवे आयाम मिळवून दिले. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यांनी पत्रकारिता केली. सामाजिक प्रश्नांबद्दल कटिबद्ध राहिलेल्या वागळे यांनी आपल्या भूमिकेशी कधी तडजोड केली नाही.. कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता वागळे आपली मते रोखठोकपणे मांडत आले आहेत. यामुळे त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या, काही वेळा त्यांच्यावर हल्लेही झाले..
पुरस्काराबद्दल वागळे यांचे अभिनंदन

LEAVE A REPLY