निखिल वागळे यांचा राजीनामा

2
1237

आयबीएन-लोकमतचे संपादक निखिल वागळे यांनी अखेर आयबीएनचा राजीनामा दिला आहे.वागळे यांनी काही क्षणापूर्वी ट्विट करून आयबीएनचा आपण राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.आयबीएन सोडले असले तरी आपण आपली पत्रकारिता सुरू ठेवणार आाहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.याचा अर्थ वागळे अन्य चॅनलमध्ये जाणार काय असा आता प्रश्न निर्माण झाला आहे.काही दिवसांपूर्वी केलेल्या एका ट्विटमध्ये वागळे यांनी आपल्याला मुंबइतील गर्दीचा कंटाळा आला असून शांत ठिकाणी जावे असे वाटते असे म्हटले होते.त्याचवेळेस स्पष्ट झाले होते की,वागळे आता राजीनामा देणार आहेत.
आयबीएन-लोकमत सुरू झाल्यापासून वागळे आयबीएनशी जोडले गेले होते.या चॅनलला लोकप्रियता मिळवून देण्यात वागळेंचा मोठा वाटा होता.मात्र नेटवर्क 18 ची मालकी रिलायन्सकडे गेल्यानंतर राजदीप सरदेसाई यांनी नेटवर्क 18 सोडले आता वागळेंनीही राजीनामा दिला आहे.गेले महिनाभर वागळे रजेवर असल्याचे आणि ते उपचार घेत असल्याचे सांगितले जात होते.मात्र आज सक ाळपासून आयबीएनवर काही नवीन पॅोमो दाखविले जात होत त्यामुळे वागळे आज रात्री 9च्या प्राईमटाइममध्ये दिसतील अशी चर्चा होती.त्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आह

2 COMMENTS

  1. निखील वागळे यांना पुढील ज्वलंत आणि जिवंत पत्रकारिता कारकीर्दीस शुभेच्छा ..

  2. श्री. न‍िखील वागळे यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील आम्ही लोक मष्ट्रातील वर्तमान राजकारनावरील तटस्थ व‍िश्लेषणास मुकलो आहे. न‍िखील वागळे यांना आता आपन मी मराठी या वाहीनीवर बघु शकतो पण त्यांच्या कार्यक्रमास पूर्वीसारखा वेळ मी मराठी या वाहीनीवर नसल्याचे न‍िदर्शनास येते. श‍िवाय मी मराठी या वाहीनीचे प्रसारनही गुनवत्तेचे नाही. रोज सकाळी न‍िखील वागळे यांचा कार्यक्रम असावा या आशेने आय बी एन लोकमत वाहीनी पाहण्याचा छंदच जडला होता, आण‍ि त्यामुळे आय बी एन लोकमत ही वाहीनी प्रथम पसंतीची वृत्त वाहीनी झाली होती आता आय बी एन वाहीनीच बघने पूर्णत: बंदच झाले आण‍ि मी मराठीवर केंव्हा न‍िखील वाघळे यांचा कार्यक्रम आहे याचा मागोवा सुरु झाला पण ………… त्यामुळे महाराष्ट्रातील महत्वपूर्ण राजकीय घडामोडींच्या तटस्थ व‍िश्लेषणाची खरी च‍िरफाड करण्याच्या भुमीकेस आय बी एन लोकमत करु शकत तर नाहीच आय बी एन लोकमत वरील वा इतर मराठी वाहीन्या असो सर्वच व‍िश्लेषणे ही व‍िश्लेषणे कमी आण‍ि प्रचारच जास्त वाटतो … महाराष्ट्रातील वर्तमान काळातील राजकीय घटामोडीवरील घनाघाती हल्यासह तटस्थ व वास्तव‍िक व‍िश्लेषणे ही न‍िखील वाघळेंशीवाय होणे म्हणजे लवनाशीवायचे कालवन/ भाजी होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here