नाशिक जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक होतेय..

0
1049

नाशिक दि.१३_पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषद संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची व्दैवार्षिक निवडणुक (२०१६_१८) प्रक्रिया सोमवार दि.१५ पासून सूरु होत असल्याची माहीती परिषदेचे मख्य विश्वस्त तथा अध्यक्ष एस. एम. देशमुख व सरचिटणीस यशवंत पवार यांनी दिली.
पुणे येथे शुक्रवारी(दि.१२)मराठी पत्रकार परिषदेेचे मुख्य विश्वस्त व अध्यक्ष एस. एम. देशमुख यांचे अध्यक्षतेखाली पदाधिकाय्रांची महत्वाची बैठक पार पडली.बैठकीस विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, सरचिटणीस यशवंत पवार, कोषाध्यक्ष मिलींद आष्टीवकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत विविध विषयांसह अमरावती व नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघांची निवडणुक प्रक्रिया सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला.त्यानुसार दि.१५ फेब्रुवारी पासून नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याचे तसेच या निवडणुकीसाठी पिंपरी_चिंचवड येथील जेष्ठ पत्रकार बाळासाहेब ढसाळ यांची निरिक्षक व सहाय्यक निरिक्षक म्हणून सुनील वाळुंज याची नियुक्ती करण्यात आल्याचे सरचिटणीस यशवंत पवार यांनी सांगितले.
दरम्यान,सोमवारी (दि.१५). निवडणुक निरिक्षक श्री. ढसाळ नाशिक येथे येत असून ते निवडणुक व सहाय्यक निवडणुक अधिकारी यांच्या नियुक्तीसह सकाळी ११ वाजता नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या १व२,पेठकर प्लाझा,मखमलाबाद नाका,पंचवटी,नाशिक_३.येथे निवडणुक कार्यक्रम जाहीर करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here