नाशिक प्रतिनीधी :- जुने नाशिक येथिल भद्रकाली पोलिस ठाण्यात दिनंक २३/३/१५ रोजी बलतकाराच्या गुन्ह्याची माहीती घेण्याकरीता काही पत्रकार गेले होते त्याच्याबरोबर एका स्थानिक वृत्तवाहीनीचे प्रतिनीधी वसिम शेख होते .रात्री ७:३० च्या सुमारास काही हल्लेखोर प्रवृतीचे लोक दुचाकीवर भद्रकाली पोलीस स्टेशन आवारात वसिमचा शोध घेण्याकरीता आले. अतिशय शांतपणे आपल्या दुचाकी पोलीस पर्किंग मध्ये पार्क करून वसिमचा शोध घेऊ लागले. बातमी संकलन करून वसिम बाहेर येताच त्याला हिंदीतून अश्लील शब्दाचा वापर करीत त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढविला वेळीच सर्व माध्यमाचे प्रतिनीधी हजर असल्यामुळे व पोलिसांनी मध्यस्ती करून हल्लेखोराना आवरले .याप्रकारात वसिमला डोक्यात तलवारीची मूठ मारल्याने गंभिर दुखापत झाली आहे . काही पत्रकारांच्या मदतीने यातील एका आरोपीला पोलिसांनी घटनास्थळी ताब्यात घेतले तर दोन फरार झाले ,वसिमला जिल्हा शासकीय रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा पर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सूरू होते . या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी नाशिक येथील पत्रकारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली असतानाही अधीक्षक चालढकल करीत असून या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण आहे