मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनात पत्रकार संरक्षण कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात पारित केला जाईल असा शब्द दिला आहे.मुख्यमंत्र्यांना आपल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज घंटानाद आंदोलन केलं गेलं.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने केल्या गेलेल्या या आंदोलनात जिल्हयातील दोनशेवर पत्रकार सहभागी झाले होते.एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार,परिषदेचे पुणे विभागीय चिटणीस शरद पाबळे,पुणे शहाराचे चिटणीस सुनील वाळुंज तसेच नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.नंतर आंदोलकांनी जिल्हाधिकार्यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.-