कालच्या निवडणूक निकालाच्या गडबडीत पत्रकारांवरील हल्ल्याच्या दोन घटना सर्वांकडूनच दुर्लक्षित राहिल्या.पहिला प्रकार सोलापुरात घडला.मतमोजणी केंद्राजवळ पोलिसांनी पत्रकारांना बेदम मारहाण केली.त्यानंतर सर्व पत्रकारांनी ठिय्या आंदोलन वगैरे केले मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिध्दी मिळाली नसल्यानं हा प्रकार जनतेपर्यंत गेलाच नाही.नागपूरमध्येही टाइम्स ऑफ इंडियाचे विलास देशपांडे आणि विलास धिराज यांना मारहाण झाल्याची बातमी आहे.या दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत असून हल्लेखोरांवर कारवाई कऱण्याची मागणी करीत आहे.–