नांदेड,हिंगोली,उस्मानाबादेत पत्रकार रस्त्यावर

0
973
छोट्या आणि मध्यम वृत्तपत्रांना देण्यात येणा़र्‍या जाहिरात दरात वाढ करावी,त्यामध्ये सुसूत्रता आणावी,पत्रकार पेन्शन योजना सुरू करावी,पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा आणि मजिठिया आयोगाची अंमलबजावणी करावी या मागण्यांसाठी आज नांदेड,हिंगोली आणि उस्मानाबादेत पत्रकारांनी आंदोलन करून जिल्हा माहिती अधिकार्‍यांना निवेदन दिले.नांदेडमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विजय जोशी,परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव कुलकर्णी,जिल्हा अध्यक्ष प्रकाश कांबळे तसेच परिषदेचे कार्यकारिणी सदस्य राम शेवडीकर आणि परिषद प्रतिनिधी प्रदीप नागापुरे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन केले गेले.त्यानंतर जिल्हा माहिती अधिकार्‍यांना निवेदन दिले गेले.जिल्हयातून दीडशेवर पत्रकार आंदोलनात सहभागी झाले होते.हिंगोली नंदकिशोर तोष्णीवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले तर उस्मानाबादेत जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव आणि राजा वैद्य,यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले गेले.तीनही ठिकाणी पत्रकार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.काल या तिनही जिल्हयात स्थानिक सुटी असल्याने तेथे आज आंदोलन केले गेले.त्यामुळे मुंबईचा अपवाद वगळता संपूर्ण राज्यात हे आंदोलन यशस्वी झाले.आंदोलन यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांचे तसेच जिल्हा संघांचे आभार मानले आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here