नांदेडमध्ये पत्रकारांचा मोर्चा

अलिबाग येथील पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर आमदाराने केलेला हल्ला आणि येलदरी येथील पत्रकाराच्या घरावर पेट्रोल टाकून जाळण्याचा झालेला प्रयत्न या दोन्ही घटनांचे तीव्र पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. नांदेडमध्ये आज नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कायाॅलयावर मोर्चा काढून दोन्ही घटनांचा निषेध केला गेला.. आ. जयंत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याबरोबरच येलदरी येथील घटनेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली.. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पत्रकारांनी काळ्या फिती लावून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या..

LEAVE A REPLY