पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी नांदेड जिल्ह्यात पत्रकार उद्याकाळ्या फिती लावून निषेध करणार वेळेवर आणि योग्य ते उपचार न मिळाल्याने पुणे येथील पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं.. याची संतप्त प्रतिक्रिया राज्यभर उमटली.. व्यवस्थेच्या नषकाळजीपणाबददल निषेध केले गेले.. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने उद्या निषेध आंदोलन केलं जात आहे.. उद्या शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील पत्रकार काळ्या फिती लावून काम करतील आणि शांततेच्या मार्गानं आपला संताप व्यक्त करतील. दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देतील.. या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प़दीप नागापूरकर, कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी सरचिटणीस, सुभाष लोणे महानगराध्यक्ष विश्वनाथ देशमुख, सरचिटणीस अभय कुळकजाईकर, कार्याध्यक्ष रविंद्र संगनवार यांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here