दणका बसला,माफीनामा आला..

0
1014
nanded 2नांदेडमधील पत्रकारांचे आंदोलन यशस्वी,नांदेड मनपाने मागितली पत्रकारांची लेखी माफी
नांदेड येथील एकमतचे निवासी संपादक चारूदत्त चौधरी यांना गिरीष कदम या मनपातील कार्यकारी अभियंत्यांना फोन करून अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली, जिवे मारण्याची धमकीही दिली.कारण होते एका बातमीचे.नांदेड शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे मात्र शहरात जे आमदार वास्तव्य करून राहतात त्यांचा भाग चकाचक आहे.हा दुजाभाव चारूदत्त चौधरी यांनी वाचकांच्या नजरेस आणून दिला.त्यामुळे कदम मजकुरांचे पित्त खवळले आणि त्यांनी फोन करून चौधरी यांना गलिच्छ शिविगाळ केली.ही बातमी जिल्हयात आणि राज्यात वार्‍यासारखी पसरली आणि सारे पत्रकार संतप्त झाले.एकीचे अत्यंत अनोखे दर्शन घडवत सारे पत्रकार आज जिल्हाधिकारी कार्यालयामसोर निदर्शने,धरणे देत आहेत.कदम यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी पत्रकारांची मागणी आहे.जिल्हयातून दोनशेच्यावर पत्रकार नांदेडच्या कलेक्टर ऑफीससमोर उपस्थित असून त्यांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे.आमच्यावर हात टाकाल अथवा शिविगाळ कराल तर यापुढे आम्ही गप्प बसणार नाही हा संदेश नांदेडचे हे पत्रकार देऊ पाहात असून संपूर्ण राज्यातील पत्रकार नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पाठिशी आहेत.गिरीष कदम यांनी कालच चौधरी यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन माफी मागितली आहे पण तेवढ्याने जमणार नाही त्यांच्यावर कारावाई झाली पाहिजे अशी रास्त भूमिका पत्रकार संघाने घेतली आहे.त्यांचे कौतूक तर केले पाहिजेच त्याचबरोबर जी भक्कम एकजूट जिल्हयातील तमाम पत्रकारांनी दाखविली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवादही दिले पाहिजेत.एकीचे हे बळच आता पत्रकारांवरील हल्ले रोखण्यास कारणीभूत ठरू शकते.आपल्याच काही नतद्रष्टांनी फुट पाडण्याचा प्रयत्न करूनही पाहिला पण त्यात त्यांना यश आले नाही आणि ते एकाकी पडले.पत्रकारांचा हा रेटाच असा होता की,कोणतीही पत्रकार हित विरोधी भूमिका कोणी मान्य करू शकणार नव्हते.आज ज्या प्रमाणात पत्रकारांची उपस्थिती आहे त्यावरून पत्रकारांचा संताप किती तीव्र आहे हेच दिसून आले आहे.मराठी पत्रकार परिषदेचा अध्यक्ष म्हणून जिल्हयातील तमाम पत्रकारांचे मनापासून आभार.
प्रकाश कांबळे यानी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून हा संघ राज्यातील क्रियाशील संघ म्हणून ओळखला जावू लागला आहे.स्पष्ट आणि रोखठोक भूमिका,पारदर्शक कारभार यामुळे जिल्हयातील बहुसंख्य पत्रकार संघाकडे आकृष्ट झालेले आहेत.अंगावर येणार्‍या प्रत्येकाला शिंगावर घेण्याची भूमिका पत्रकार ंसंघाने घेतल्याने सर्व सदस्यांमध्ये नवा आत्मविश्‍वास बळावला आहे हे नक्की.नांदेडने संजीव कुलकर्णी ,नंदकुमार देव आणि सुधाकर डोईफोडे हे तीन अध्यक्ष परिषदेला दिले.चारूदत्त चौधरी हे परिषदेचे माजी सरचिटणीस आहेत.विजय जोशी परिषदेचे विभागीय चिटणीस असून श्रीराम शेवडीकर हे कार्यकारिणी सद्सय म्हणून उल्लेखनिय काम करीत आहेत.एक चांगली टीम नांदेडला लाभण्याने यापुढे पत्रकारांशी कोणीही दादागिरी करणार नाही हे नक्की.
पत्रकारांचा संताप लक्षात घेऊन मनपा उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी नांदेड मनपाच्यावतीने स्वतः पत्रकारांसमोर येऊन जाहीर लेखी माफी मागितली.गिरीष कदम यांनीही लेखी मागितली आहे.त्यामुळे पत्रकारांचा विजय झाला आहे.
 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here