रस्त्यावर एखादा अपघात झाल्यानंतर अनेकदा आपण निर्विकारपणे पुढे जात असतो.खरं तर अपघातानंतर गोल्डन अवरमध्ये जर उपचार झाले तर प्राण वाचण्याची शक्यता असते.मात्र नंतरच्या कटकटी टाळण्यासाठी अपघाताकडं न बघताच अनेकजण पुढं निघून जातात.मात्र नगरच्या पत्रकारांनी असं केलं नाही..सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय आणून देत एका अपघातात जखमी झालेल्या एका महिलेला मदत करण्यापासून रूग्णालयात घेऊन जाण्यापर्यंतची सारी व्यवस्था या पत्रकारांनी केली.नगरच्या पत्रकारांची ही संवेदनशीलता नक्कीच अभिनंंदनास पात्र आहे.

मुंबई-पुणे रस्त्यावर केडगाव उड्डाणपुलाजवळ एका अज्ञात वाहनाने दीपाली विठ्ठल पठारे या पंचवीस वर्षीय महिलेला ठोकर मारली.नंतर हा वाहन चालक पसार झाला.गंभीर जखमी झालेल्या दीपाली पठारे किती तरी वेळ रस्त्यावर पडून होत्या.वाहनं येत होती…जीत होती..मात्र कोणीती दीपाली पठारे यांच्या मदतीला आले नाही.थोडया वेळाने नगर प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख,समीर मनियार आणि महेश महाराज देशपांडे हे पत्रकार घटनास्थळापासून जात असताना त्यांना जखमी अवस्थेत दीपाली पठारे पडलेल्या दिसल्या..क्षमाचाही विलंब न करता या पत्रकारांनी दीपाली पठारे यांना उचलून आनंदऋुषी रूग्णालायत उपचारासाठी नेले.मात्र गोल्डन अवर टळून गेलेला होता.रक्तश्रावही मोठ्या प्रमाणात झालेला होता.त्यामुळं दीपाली पठारे यांचा मृत्यू झाला.दीपाली पठारे येथील कृषी विभागात कार्यरत होत्या.त्यांना सहा महिन्याची एक मुलगी आहे.अत्यंत दुदैवी या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.पत्रकारांनी दाखविलेल्या संवेदनशीलतेबद्दल सर्वत्र पत्रकारांचे कौतूक होत आहे.अपघातात कोणी सापडल्यास तेथून पुढे निघून न जाता त्याला मदत करावी असे आवाहन अहमदनगर प्रेस क्लबने केले आहे..–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here