दौड तालुक्यातील पाटस येथील पत्रकार आणि दौड तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव संजय सोनवणे आज दुपारी पाटस येथील बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता तेथे उपस्थित पोलिसांपैकी एका महिला कॉन्स्टेबलने त्यांना घटनेचे फोटो काढण्यास मज्जाव केला आणि त्यांच्याकडील मोबाईल काढून घेत त्यांना धक्काबुक्की केली.या घटनेचा दौड तालुका पत्रकार संघाने निषेध केला असून संबंधित महिला पोलिस कॉन्स्टेबलवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब गोरे यांनीही या घटनेचा निषेध केला आहे.दरम्यान पुढील दिशा ठरविण्यासाठी दौंड तालुक्यातील पत्रकार उद्या सकाळी अकरा वाजता एकत्र येत आहे.