12 मे रोजी दोन ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले.पेठ तालुक्यातील पत्रकार राजेंद्र तख्ते यांच्यावर प्राणघातक हल्ला केला गेला.त्यात त्यांना चांगलीच दुखापत झाली आहे.
दुसरा प्रकार पुणे जिल्हयात इंदापूरला घडला.भीमानदीतून होणार्या बेकादेशीर वाळू उपश्याच्या विरोधात बातमी संकलीत करण्यासाठी गेलेल्या भारत पांडुरंग शेडगे (रा.कालठाण ) याच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला.त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली असून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दोन्ही घटनांचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती निषेध करीत आहे.