रायगड लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी-कॉग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यावर 25 हजार कोटीची मालमत्ता जमविल्याचे आरोप करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी सुनील तटकरे यांनी दैनिक कृषीवलला शंभर कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठविली आहे.सुनील तटकरे यांच्या कथित भ्रष्टाचाराची माहिती देणारी एक श्वेतपत्रिका शेकापने प्रसिध्द केली होती.ती पुरवणीच्या स्वरूपात कृषीवलनं मंगळवारच्या अंकात प्रसिध्द केली होती.कृषीवलेने केलेल्या आरोपाचे उत्तर आपण कायदेशीर पध्दतीनं देणार आहोत असं सुनील तटकरे यांनी कालच जाहीर केले होते.त्यानंत त्यांनी तातडीने आपले वकिल ऍड.व्हि.ए.गांगल यांच्या मार्फत ही नोटीस क ृषीवलच्या संपादकांच्या नावे इ -मेलने पाठविली आहे.

LEAVE A REPLY