देवडी : दुष्काळाला हरवताना..

आमच्या गावची पाणी टंचाई दूर करायची, गावातून दुष्काळ हद्दपार करायचा आणि गाव पाणीदार करायचं हे आमचे वडिल माणिकराव देशमुख यांचं जुनं स्वप्न होतं. ते सरपंच असताना त्यांनी तसा प्रयत्न देखील केला. त्यात ते यशस्वी देखील झाले. मात्र नंतरच्या काळात दुष्काळाची तीव्रता वाढत गेली. त्यामुळे झालेले प्रयत्न अपुरे पडू लागले. गाव पाणीदार करायचे असेल तर गावातील नदीचे रूंदीकरण आणि खोलीकरण करून त्यावर बंधारा बांधावा असा त्यांचा माझ्यामागे आणि आमचे बंधू दिलीप देशमुख यांच्यामागे सतत लकडा असायचा . आमचेही त्यादृष्टीने प्रयत्न सुरू होते. सकाळ रिलिफ फंडानं त्यासाठी मदत करण्याचं आश्वासन आमचे बंधू दिलीप देशमुख यांना दिलं आणि लगेच कामाचा श्रीगणेशा देखील आमचे वडिल माणिकराव देशमुख यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात केला गेला . गेल्या पंधरा वीस दिवसात नदीच्या खोलीकरणाचं आणि रूंदीकरणाचं ७५ टक्क्यापेक्षा जास्त काम झालं आहे. आज भिंतीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सकाळचे जिल्हा प़तिनिधी दत्ता देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्यांनी या बंधारयाचे स्वप्न पाहिले ते माझे वडिल आजच्या कायॅक़मास उपस्थित नव्हते. त्यांना एक अपघात झाल्याने ते पुण्यात संचेतीमधये उपचार घेत आहेत. त्यांची अनुपस्थिती आम्हा सवाॅनाच जाणवली. काय॓क़मास माझ्यासह गावचे सरपंच जालंधर झाटे, माजी पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र झाटे, रामभाऊ आगे, माजी सरपंच त्र्यंबक झाटे, बंधारयाचं काम करणारे बोबडे, खडके गुरूजी, गोरख पैठणे, बाबासाहेब झाटे, अंकुश झाटे पत्रकार मोरे, साईट मॅनेजर राऊत तसेच अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ७२ फूट लांबीची ही भिंत १० मे पय॓त पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
आमच्या वडिलांनी पाहिलेले गावच्या कल्याणाचे स्वप्न आमच्या कडून पूर्ण होत आहे. आमच्यासाठी यासारखा दुसरा आनंदाचा क्षण नाही. मुंबई – गोवा महामार्गासाठी कोकणातील पत्रकारांनी सतत पाच वर्षे माझ्या नेतृत्वाखाली लढा दिला.. तो लढा यशस्वी झाला आणि रस्त्याचं काम सुरू झालं त्या दिवशी मी जेवढा खूष होतो तोच आनंद आज मी उपभोगतो आहे..गावातील दुषकाळाला हद्दपार करून मातृभूमीचया श्रुणातून मुक्त होण्याचा माझा आणि माझ्या बंधुंचा छोटासा प्रयत्न आहे. ग्रामस्थांची साथ आणि सहकारयामुळेच हे शिव धनुष्य आम्हाला उचलता आलं. आभार सकाळ रिलीफ फंड… आभार देवडी ग्रामस्थ..
बंधारा पूर्ण होईल तेव्हा गाव पाणीदार होणार आणि गावकरयांना गतवैभवाची अनुभूती घेता येणार आहे. बंधारयात दहा कोटी लिटर पेक्षा जास्त पाणीसाठा होईल अशी अपेक्षा आहे.

एसेम देशमुख

LEAVE A REPLY