दिवाकर रावतेजी थॅक्स..
पत्रकारांना शिवशाही,शिवनेरीमधून मोफत प्रवास ?
मुंबईः परिवहन मंत्री आणि शिवसेनेचे नेेते श्री.दिवाकर रावते यांना विशेष धन्यवाद द्यायला हवेत.त्यांनी अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शिवनेरी आणि शिवशाही या वातानुकुलीत गाड्यातून मोफत प्रवासाची सवलत देण्याचे तत्वतः मान्य केले आहे.एस.टी.महामंडळाच्या काल मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतल्याने आता राज्यातील पत्रकारांना शिवशाही आणि शिवनेरीचा लाभ घेता येईल.मात्र महामंडळाच्या या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणे आवश्यक आहे.म्हणजे या सवलतीसाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.दिवाकर रावते यांनी घेतलेल्या या महत्वाच्या निर्णयाबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी दिवाकर रावते यांचे आभार मानलले आहेत.
शिवशाही गाडया आल्यानंतर राज्यातील बहुतेक मार्गावरील एशियाड गाड्या जवळपास बंदच झाल्या.अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना साधी गाडी आणि एशियाडमधून मोफत प्रवासाची सवलत होती.मात्र एशियाड बंद झाल्याने पत्रकारांना सवलत असून नसल्यासारखीच झाली होती.कारण लाल डब्यातून दूरचा प्रवास करणे तापदायक असल्याने सवलतीचा कोणी लाभ घेत नव्हते.त्याबद्दल राज्यातील अनेक पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेकडे तक्रारी केल्यानंतर परिषदेने एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने 26 डिसेंबर 2017 रोजी एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन शिवशाही आणि शिवनेरीतून मोफत प्रवासाची सवलत सुरू करावी अशी मागणी केली होती.या मागणीबद्दल दिवाकर रावते यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपली मागणी रास्त असून त्याचा विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते.त्यानुसार काल महामंडळाच्या बैठकीत आश्वासनाची पूर्तता कऱण्यात आली.मंत्रिमंडऴाच्या निर्णयानंतर या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती दिवाकर रावते यांनी दिली आहे.
सध्या एसटीच्या साध्या गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत आहे. ही सवलत अन्य आरामदायी गाड्यांनाही लागू करावी, अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी होती. त्याअनुषंगाने आज या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. रावते म्हणाले की, एसटीच्या “शिवशाही’, “शिवनेरी’सह इतर सर्व अत्याधुनिक आणि आरामदायी गाड्यांमध्ये अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना मोफत प्रवास सवलत देण्याबाबत एसटी महामंडळ पूर्ण सकारात्मक आहे. याबाबत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने अधिस्वीकृतीधारक पत्रकारांची संख्या तसेच संभाव्य खर्चाची माहीती एसटी महामंडळास सादर करावी. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर प्रस्ताव सादर करुन मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर ही सवलत योजना तातडीने लागू केली जाईल, असे ते म्हणाले.
एसटी महामंडळामार्फत विविध घटकांना प्रवास सवलत योजना राबविण्यात येतात. या विविध सवलत योजनांचा संपूर्ण खर्च आता परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. सर्व विभागांच्या सवलत योजनेचे दायित्व आता परिवहन विभाग स्वीकारणार असून मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय अंमलात येईल. पत्रकारांसाठीच्या सवलत योजनेचा खर्च आतापर्यंत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात येत होता. पण आता हा खर्चही परिवहन विभागामार्फत करण्यात येणार आहे. परिवहन विभाग हा पत्रकारांच्या सवलतीची व्याप्ती वाढविण्याबाबत पूर्ण सकारात्मक आहे, असे ते म्हणाले.
26-12-2017रोजी दिवाकर रावते यांना भेटलेल्या शिष्टमंडळात किरण ना ईक,परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस अनिल महाजन,कार्याध्यक्ष गजानन नाईक,कोषाध्यक्ष शरद पाबळे,परिषदेचे माजी सरचिटणीस यशवंत पवार,लातूर विभागीय चिटणीस विजय जोशी लातूरचे घोणे आदि सहभागी झाले होते.यावेळी दिवाकर रावते यांच्या हस्ते परिषदेच्या कॅलेंडरचे प्रकाशनही कऱण्यात आले होते. रावते यांना भेटलेल्या परिषदेच्या शिष्टमंडळा
(ऑनलाईन प्रभात मधील बातमीच्या आधारे )